एक रुपयांच्या नोटांचे बंडलची किंमत आहे ५० हजार रुपये, तुमच्याकडे आहे का एक रुपया

एक रुपयांच्या मोबदल्यात तुम्हाला मिळेल ५० हजार रुपये

एक रुपयांच्या मोबदल्यात तुम्हाला मिळेल ५० हजार रुपये

जर तुम्हाला कल्पना नसेल आणि तुमच्या खिशातून अचानक खूप मोठी रक्कम निघाली तर तुम्हाला साहजिकच आनंद होईल. असेच जर तुमच्याकडे एखादे जुने नाणे असेल किंवा जुनी चलनी नोट असेल आणि त्या नोटेने किंवा नाण्याने तुम्हाला हजारो रुपये मिळवून दिले तर त्याचा आनंद काही निराळाच असेल.

अशाच एका नोटेबद्दल जाणून घेऊया जी सध्या चलनात नाही मात्र ती नोट तुमचा जबरदस्त फायदा करून देऊ शकते. अशा जुन्या नोटांची किंवा जुन्या नाण्यांची किंमत किती मोठी आहे, ती किती मूल्यवान आहेत हे तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्म असलेल्या antiques आणि collectables वर माहित होईल.

१ रुपयांची चलनी जुनी नोट ४५,००० रुपयांना

या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर किंवा वेबसाईटवर असे अनेक ग्राहक आहेत किंवा अशी अनेक माणसं आहेत जी जुन्या नोटा किंवा जुनी नाणी विकत घेऊ इच्छितात. फक्त विकत घेऊ इच्छितात इतकेच नव्हे तर त्यासाठी चांगली घवघवीत किंमतदेखील मोजायची त्यांची तयारी असते. असेच एक १ रुपयांची चलनी जुनी नोट ४५,००० रुपयांना विकली जाते आहे.

१ रुपयांच्या नोटेची किंमत

जुन्या चलनी नोटा किंवा नाण्यांच्या ट्रेडिंग किंवा खरेदी-विक्रीची वेबसाईट किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म असलेल्या Coinbazzar वर १ रुपयांची जुनी चलनी नोट विकली जाते आहे. या १ रुपयांच्या जुन्या चलनी नोटेवर १९५७चे माजी केंद्रीय अर्थमंत्री हीरूभाई एम पटेल (Former Union Finance Minister Hirubhai M. Patel)यांची सही किंवा हस्ताक्षर आहे. यासोबतच या १ रुपयांच्या जुन्या चलनी नोटेची सीरियल संख्या १२३४५६ अशी आहे. इथे जुन्या १ रुपयांच्या चलनी नोटांच्या बंडलची किंमत ४९,९९९ रुपये इतकी आहे. कॉईनबझारने (Coinbazzar)या १ रुपयांच्या जुन्या नोटांच्या बंडलवर ५,००० रुपयांचा डिस्काउंट किंवा सूट दिली आहे. यामुळे या जुन्या १ रुपयांच्या नोटांच्या बंडलची किंमत कमी करून ४४,९९९ रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.

 

जुन्या वस्तूंचे दर्दी रसिक

सध्या अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म किंवा वेबसाईट उपलब्ध आहेत ज्यावर जुन्या वस्तू, नोटा, नाणी, जुनी शिल्पं, जुनी चित्रे आणि असंख्य प्रकारच्या जुन्या वस्तू विकल्या जातात. अशा जुन्या वस्तूंना दर्दी रसिकांमध्ये मोठी मागणी असते. ते या वस्तूंसाठी वाटेल ती किंमत मोजण्यास तयार असतात. त्यामुळे या जुन्या वस्तूंना चांगली घवघवीत किंमतदेखील मिळत असते. तुम्हालादेखील अशा जुन्या वस्तूंची आवड असेल आणि त्या तुम्हाला मिळवायच्या असतील आणि तुमच्या कलेक्शनमध्ये ठेवायच्या असतील तर तुम्हीदेखील अशा वेबसाईटना भेट देऊ शकता किंवा तुमच्याकडील जुन्या वस्तू विकून चांगली कमाईदेखील करू शकता.

 

परदेशात तर या प्रकारच्या जुन्या वस्तू खरेदी करण्याचे आणि आपल्या घरात ठेवायचे मोठे वेडच आहे. विशेषत: अमेरिका आणि युरोपात अशा दर्दी रसिकांची संख्याही मोठी आहे. शिवाय आर्थिक समृद्धीमुळे ते वाटेल ती किंमत मोजण्यास तयार असतात. अशा जुन्या वस्तू, चित्रे, मुर्ती, शिल्पे, नाणी यांचे तिथे लिलावदेखील होत असतात आणि त्या लिलावात मोठमोठ्या बोलीदेखील लावल्या जातात.

एक रुपया एक रुपयांच्या नोटांचे बंडल Bundle of one rupee notes १ रुपयांच्या नोटेची किंमत Price of 1 rupee note
English Summary: A bundle of one rupee notes costs Rs 50,000, do you have one rupee

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.