राज्याच्या राजकारणात दुसऱ्यांदा मोठा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजपच्या युतीत सामील झाले आहेत. अजित पवार शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजितदादा हे राजभवनावर दाखल झाले आहेत. त्यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा राजभवनाकडे निघाले आहेत.
राष्ट्रवादीचे 9 मंत्री शपथ घेणार आहेत. तर 30 नेत्यांचा अजित पवारांना पाठिंबा आहे. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे यांच्यासह काही नेते अजित यांना पाठिंबा देत आहेत.
अजित पवार यांच्या बैठकीला उपस्थित आमदार
दिलीप वळसे पाटील
छगन भुजबळ
हसन मुश्रीफ
किरण लहमाटे
सरोज अहिरे
अशोक पवार
अनिल पाटील
सुनिल टिंगरे
अमोल मिटकरी दौलत दरोडा
अनुल बेणके
रामराजे निंबाळकर
धनंजय मुंडे
निलेश लंके
मकरंद पाटील
Published on: 02 July 2023, 02:28 IST