राज्याला वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीने पुढील दोन वर्षांसाठी दरवाढ जाहीर केली असून लघुदाब आणि उच्चदाब कृषिपंपांसाठी ४ रुपये १७ पैसे ते ८ रुपये ५९ पैसे प्रतियुनिट वाढ करण्यात आली आहे. २०२३-२४ मध्ये ९.३० तर २०२४-२५ या वर्षात २०.९३ टक्के वाढ करण्यात आली आहे. महावितरणसह अन्य खासगी कंपन्यांनीही वाढ केली आहे. मात्र, महावितरणने केलेली दरवाढ अधिक आहे.
यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा बोजा होणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाने महावितरण, बेस्ट, टाटा आणि अदानी वीज कंपनीचे २०२३-२४ आणि २०२४-२५ चे घरगुती, कृषी, औद्योगिक आणि वाणिज्यिक दर जाहीर केले आहेत. महसुली तूट भरून काढण्यासाठी कंपन्यांनी दरवाढीची मागणी केली होती. महावितरणची महसुली तूट ६७ हजार ६४३ कोटी रुपये असून आयोगाने ३९ हजार ५३७ कोटी रुपयांची वाढ मंजूर केली आहे.
लघुदाब शेतकऱ्यांच्या कृषिपंपासाठी स्थिर आणि मागणी आकारात ४३ रुपये हॉर्सपॉवर दर आकारला जात होता. तो २०२३ -२४ मध्ये ४७ तर २०२४-२५ मध्ये ५२ रुपये करण्यात आला आहे. तर शेती आणि इतर कारणासाठी वीजेसाठी हॉर्सपॉवरसाठी ११७ रुपये दर आकारला जात होता.
महाराष्ट्राचा पहिला नंबर! पण कशात, इतर राज्यांच्या तुलनेत सर्वांत महाग वीज महाराष्ट्रात..
तो २०२३-२४ मध्ये १२९ रुपये तर २०२४-२५ मध्ये १४२ रुपये दर आकारला जाणार आहे. ही टक्केवारी अनुक्रमे १०.२९ आणि २१.३७ टक्के आहे. युनिटनुसार दर आकारणीमध्ये सध्या लघुदाब शेतीपंपांसाठी ३.३० पैसे प्रतियुनिट दर आकारला जात होता. तो आता २०२३-२४ मध्ये ४.१७ रुपये आणि २०२४-२५ मध्ये ४.५६ रुपये प्रतियुनिट दर आकारला जाणार आहे.
कर्मचारी झाले आता राज्यातील तहसीलदार संपावर
शेती आणि इतर ग्राहकांसाठी सध्या ४. ३४ रुपये प्रतियुनिट दर आकारला जात होता. २०२३-२४ मध्ये ६.२३ रुपये तर २०२४-२५मध्ये ६.८८ रुपये दरवाढ करण्यात आली आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
सिबिल स्कोअरची अट न लावता बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज द्यावं, सरकारचा आदेश बँका पाळणार का?
पुणे जिल्हा बँकेच्या पीक कर्ज मर्यादेमध्ये वाढ, शेतकऱ्यांना दिलासा..
आता नुकसान झालेल्या पिकांची सरकार करणार खरेदी, 'या' सरकारची मोठी घोषणा..
Published on: 04 April 2023, 01:13 IST