निसर्गाच्या लहरीप्रमाणे बाजारपेठेतील शेतीमालाचे दर कमी-जास्त होत आहेत. तुरीच्या दरात झपाट्याने घसरण सुरु झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतकरी आता दरवाढीची प्रतिक्षा करीत आहेत. तुरीच्या उत्पादनात घट होऊन देखील कवडीमोल दर मिळत असेल तर साठवणूक परवडली नाही.
तुरीच्या दरात घसरण
बाजारपेठेत हमीभावापेक्षा अधिकचा दर तुरीला मिळत होता. सरकारने मुक्त तुरीच्या आयातीला मुदत वाढवून दिली आहे. या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे दरात तब्बल 600 रुपयांची घसरण झाली आहे. घसरण आणखी वाढत चालली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
कौतुस्कास्पद ! "शेतकऱ्याची लेक झाली अधिकारी"
वीज तुटवडा भरून काढण्यासाठी राज्य सरकारची धडपड; ऊर्जामंत्र्यांचा छत्तीसगढ दौरा
या परस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आता खरेदी केंद्राचाच आधार घ्यावा लागणार आहे. कारण खरेदी केंद्रावर तुरीला 6 हजार 300 असा दर ठरवून देण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांचा कल हा साठवणूकीवरच अधिक आहे. वाढीव दरासाठी शेतकऱ्यांनी ही भूमिका घेतली असून तुरीची विक्री आता हमीभाव केंद्रावर होऊ लागली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
दिलासादायक ! महिन्याभरात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लागणार, असे केले आहे नियोजन...
कृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी आता कृषी यंत्रावर मिळणार अनुदान
Published on: 21 April 2022, 04:51 IST