News

जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे बघितले जाते. असे असताना आता हा धंदा करणे अवघड झाले आहे. आता दूधदरात मोठी घसरण झाली असून 40 रुपयांपर्यंत गेलेले हे दर 32 वर आले आहेत. यामुळे शेतकरी अडचणीत गेला आहे. पशुखाद्याच्या दरात मात्र मोठी वाढ झाली आहे.

Updated on 21 June, 2023 4:05 PM IST

जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे बघितले जाते. असे असताना आता हा धंदा करणे अवघड झाले आहे. आता दूधदरात मोठी घसरण झाली असून 40 रुपयांपर्यंत गेलेले हे दर 32 वर आले आहेत. यामुळे शेतकरी अडचणीत गेला आहे. पशुखाद्याच्या दरात मात्र मोठी वाढ झाली आहे.

त्यामुळे आता दुधाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे. माजी मंत्री सदाभाऊ खोत आता आक्रमक झाले आहेत. दरम्यान, जर्सी दुभत्या गायींचे प्रमाण जास्त असून आता या पशुपालकांकडे उपलब्ध असणारा चारा संपला आहे.

अशातच पावसानेही दडी मारली असून पशुखाद्यात दरवाढ झाली आहे. त्यामुळे पशुपालकांवर दुहेरी संकट आले आहे. यामुळे शेतकरी आता आंदोलनाच्या तयारीत आहेत. मागील काही दिवसांपासून दुधाचे दर वाढले होते.

जनावरांना चाऱ्यामधून होतेय विषबाधा, जाणून घ्या कशी घेयची काळजी...

त्यामुळे पशुपालक दुग्ध व्यवसाय वाढवण्याच्या तयारीत होते, मात्र आता ते अडचणीत आले आहेत. यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आता शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.

ऊस वाहतुकदारांची ऊस तोडणी मुकादमांकडून होणाऱ्या फसवणुकीवर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, फसवणुकीवर बसणार आळा

अलीकडच्या काळात दूध उत्पादन ७ ते १० टक्क्यांनी वाढले असल्याचे कळते. दुसरीकडे दुग्धजन्य पदार्थ आयातीच्या चर्चेमुळे देखील दुधाचे दर कमी झाले असल्याचे सांगितले जातेय. 

गाईच्या दुधाला लिटरला 75 रुपये दर तर म्हशीच्या दुधाला सव्वाशे रुपये दर द्या, सदाभाऊ खोत यांची मागणी
येत्या 72 तासांत मान्सून महाराष्ट्र व्यापणार! हवामान विभागाकडून मोठी माहिती..
खरे की बनावट, हे खत कसे? शेतकरी बंधुनो या टिप्स त्वरित जाणून घ्या

English Summary: A big blow to farmers! Cow milk prices fall by Rs 8, animal feed prices rise, farmers prepare for agitation
Published on: 21 June 2023, 04:05 IST