News

आपल्या समाजामध्ये किंवा भारतामध्ये समाजनिष्ठ लोकांपेक्षा स्वार्थीनिष्ठ लोक जास्तच बघायला मिळतात.

Updated on 16 December, 2022 4:44 PM IST

आपल्या समाजामध्ये किंवा भारतामध्ये समाजनिष्ठ लोकांपेक्षा स्वार्थीनिष्ठ लोक जास्तच बघायला मिळतात. परंतु याच समाजात असेही काही लोक आहेत जे की नेहमी लोकांच्या शेतकऱ्यांच्या हिताचा विचार सतत करत असतात.त्याचप्रमाणे आपल्या भारत देशातील धनश्री मानधने नावाची एक वीस वर्षाची तरुणी अमेरिका शिक्षणासाठी गेले असता तिच्या डोक्यात वेगवेगळ्या कल्पना आल्या अमेरिकेसारखी श्रीमंती आपल्या

भारतात का नाही? अमेरिकेसारखे प्रगतशील शेतकरी आपल्या भारतात का नाही? एकंदरीत आपल्या भारतातील शेतकऱ्यांना शेती करून पैसा का समाधानकारक उरत नाही? भारतातील शेतकरी चुकतो तरी कुठे ? या प्रश्नांवर अनेक दिवस अभ्यास केला त्याची उत्तरे शोधून काढली. I studied these questions for many days and found out the answers. आणि त्यांच्याशी या विषयावर बातचीत केली असता त्यांनी सांगितले की शेती करत असताना भारतातील शेतकऱ्यांनी

शेतीविषयक ज्ञान वाढवले पाहिजे. शेती हा विषय खूप मोठा आहे जसे आपण कृषी विषयक ज्ञान आत्मसात करू तस तसे आपले कृषी विषयक उत्पन्न वाढत जाईल आणि खर्चही कमी होतो.धनश्री मानधने या भारतातील शेतकऱ्यांसाठी काय पावले उचलणार?धनश्री मानधने या जरी वीस वर्षांच्या असल्या तरी त्यांची कल्पनाशक्ती ही खूप प्रदीर्घ आहे. आणि त्यांनी शेतकऱ्यांसाठी विशेष असा अभ्यास केला आहे. मानधन यांनी ठरवले आहे की शेतकऱ्यांचे ज्ञान

वाढवून शेतीचा खर्च कमी करणे, शेतीचे उत्पन्न वाढविणे या महत्त्वाच्या बाबी त्यांनी हाती घेतले आहेत.माननीय यांनी यासाठीच एका माध्यमाची उपलब्धता केली आहे. त्या माध्यमाचे नाव आहे सलाम किसान नावाप्रमाणेच इतर लोकांनी शेतकऱ्याला सलाम करावा या पद्धतीने बसवण्याचा त्यांचा मानस आहे. त्या अंतर्गत शेतकऱ्यांना क्षणोक्षणी अगदी घडाळ्यातील सेकंदाच्या काट्याप्रमाणे जलद गतीने कृषी विषयक माहिती माहिती शेतकऱ्यांना पोहोचवनार आहे.

 

(गोपाल उगले)

English Summary: A 20-year-old girl from America has taken up the ambition to make farmers in India rich
Published on: 16 December 2022, 04:44 IST