पुणे
राज्याच्या बहुतांश भागात चांगला पाऊस झाला. मात्र अद्यापही काही भागातील शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहे. तरी राज्यात खरीप पीक पेरा (kharif swoing update) ९३ टक्क्यांच्या पुढे गेला आहे, अशी माहिती कृषी आयुक्तालयाने दिली आहे.
कृषी आयुक्तालयाच्या माहितीनुसार, राज्यातील खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र १४२ लाख हेक्टर आहे. राज्यात बहुतेक भागात पेरणीची कामे उरकत आली आहेत. काही ठिकाणी कापूस, सोयाबीन, तूर तसेच भाताच्या पुनर्लागवडीची कामे सुरू आहेत.
राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान पूर्ण १०० टक्के पाऊस झाला आहे. या दरम्यान सरासरी ६०३ मिलीमीटर इतका पाऊस होता. तर यंदा प्रत्यक्षात ६०२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांना खते, कीटकनाशके आणि बियाणे याबाबत समस्या निर्माण झाल्यास तात्काळ तक्रार करावी, असं आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केलं आहे.
Published on: 09 August 2023, 11:27 IST