News

राज्याच्या सर्व भागात मान्सून सक्रीय झाला असून राज्यात 1 जून ते 21 ऑगस्ट या कालावधीत सरासरी 757.7 मि.मी. म्हणजेच एकूण सरासरीच्या 91.1 टक्के पाऊस झाला आहे. तसेच राज्यातील जलाशयांमध्ये 59.17 टक्के साठा निर्माण झाला आहे.

Updated on 23 August, 2018 3:20 AM IST

राज्याच्या सर्व भागात मान्सून सक्रीय झाला असून राज्यात 1 जून ते 21 ऑगस्ट या कालावधीत सरासरी 757.7 मि.मी. म्हणजेच एकूण सरासरीच्या 91.1 टक्के पाऊस झाला आहे. तसेच राज्यातील जलाशयांमध्ये 59.17 टक्के साठा निर्माण झाला आहे.

राज्यातील 14 जिल्ह्यांत 100 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत प्रत्यक्ष पडलेल्या पावसाच्या नोंदीनुसार 14 जिल्ह्यांमध्ये 100 टक्के पेक्षा जास्त पाऊस पडला असून त्यामध्ये ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, नांदेड,हिंगोली, अकोला, वाशिम, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.

त्याचप्रमाणे 18 जिल्ह्यांमध्ये 75 ते 100 टक्के यादरम्यान पावसाची नोंद झाली असून त्यामध्ये सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद, जालनाबीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारागोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच 50 ते 75 टक्के पावसाची नोंद झालेल्या जिल्ह्यांमध्ये नंदुरबार आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

जलाशयांमध्ये 59 टक्क्यांपेक्षा जास्त जलसाठा

राज्यातील जलाशयात 21 ऑगस्ट 2018 अखेर 59.17 टक्के साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच सुमारास 54.54 टक्के साठा होता. यावर्षी आणि गेल्या वर्षीचा तुलनात्मक पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. सर्वाधिक जलसाठा कोकण विभागात 90.38 टक्के (91.52) इतका उपलब्ध आहे. तसेच पुणे विभागात 80.50 टक्के (73.79), नाशिक विभागात 54.57 टक्के (61.19), अमरावती विभागात 45.85 टक्के (22.10), नागपूर विभागात 41.94 टक्के (23.99) आणि मराठवाडा विभागात 22.31 टक्के (29.34) इतका साठा उपलब्ध आहे.

English Summary: 91 % average rainfall in Maharashtra
Published on: 21 August 2018, 09:51 IST