Mumbai News : राज्यातील मंत्रीमंडळ विस्तार अजूनही रखडलेला आहे. तर शिंदे गट, राष्ट्रवादी आणि भाजपचे आमदार मंत्रिपदाची माळ गळ्यात पडावी यासाठी आस लावून बसले आहेत. मात्र रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल हे सांगता येत नाही. तसंच थेट नऊ मंत्री मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्रिमंडळात दिसणार नसल्याचं मोठं विधान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
राज्यातील मंत्रीमंडळ विस्तारनंतर ९ मंत्री मंत्रिमंडळात दिसणार नाहीत. तसंच ते ९ मंत्री भ्रष्टाचारी आहेत असा खळबळजनक दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी हा आरोप केला आहे.
राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलाने आणि त्यांच्या सीएने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आहे. हसन मुश्रीफ यांच्या कारखान्याने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. हे समोर आले आहे. त्यामुळे मुश्रीफ यांना एक मिनिट ही मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही. सरकारने त्यांचे मंत्रिपद काढून घ्यावे, अशी मागणी यावेळी वडेट्टीवार यांनी केली आहे.
शेतकऱ्यांची फसवणूक करणारा मंत्री सरकारमध्ये कसा राहू शकतो? हसन मुश्रीफ यांचा राजीनामा लवकरात लवकर सरकारने घ्यावा, अशी मागणी करत विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा जाहीर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. निवडणूक आयोगाच्या सुनावणीत अजित पवार गटाने आपल्यासोबत ४२ आमदार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे बेचाळीसावा आमदार कोण याचीच चर्चा सुरु झाली होती. त्यावर हे वृत्त समोर आलं आहे.
Published on: 07 October 2023, 03:35 IST