पंतप्रधान पिक विमा योजनेची मुदत ही 15 जुलैला संपत होती. परंतु राज्य शासनाने केंद्राकडे मुदत वाडी संबंधीचा प्रस्ताव पाठवल्यामुळे केंद्राने 23 जुलैपर्यंत मुदत वाढ केली आहे. परंतु नाशिक जिल्ह्यात पिक विमा काढण्याचा शेतकऱ्यांमध्ये स्वारस्य दिसत नाही. जिल्ह्यात पावसात सातत्य नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरवली आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार 80 हजार 131 शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील 18 हजार 324 शेतकऱ्यांनी विम्याचा हप्ता भरत पिक विमा भरणाऱ्या मध्ये नाशिक जिल्ह्यात मालेगाव तालुका अव्वल असून दिंडोरी तालुका पिछाडीवर असून दिंडोरी तालुक्यात फक्त दीडशे शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजना प्रमुख्याने प्रतिकूल हवामानामुळे पेरणी, लागवड केलेल्या पिकांची उगवण व्यवस्थित न होणे, अति पाऊस, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणीपश्चात नुकसान, पेरणीपासून ते काढणीपर्यंत विविध कारणांमुळे उत्पादनात येणारी घट इत्यादी गोष्टींमुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळावे यासाठी ही योजना आहे. खरिपाची पेरणी झाल्यानंतर साधारण एक महिन्याच्या आत पिक विमा भरणे आवश्यक असते. दरवर्षीचा विचार केला तर पिक विमा भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै असते परंतु या वर्षी 15 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती, परंतु ती आता वाढवून 23 जुलै करण्यात आली आहे. वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळे प्रकारची विमा रक्कम भरायची असते. शेतकरी विमा रक्कम एक कोटी जेवढी रक्कम भरतो त्याचे राज्य सरकार आणि केंद्र सरकार प्रत्येकी 40 टक्के रक्कम भरत असते.. या वर्षी पीक विम्याची रक्कम वाढला गेल्याने अनेक शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरवली आहे.
नाशिक जिल्ह्यातील तालुका निहाय विमा भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या
- मालेगाव – 18 हजार 324
- कळवण- 1068
- त्र्यंबकेश्वर 1946
- इगतपुरी- आठ हजार 970
- सुरगाणा – 3550
- बागलान – सात हजार 469
- चांदवड- नऊ हजार 106
- देवळा – 5054
- नांदगाव – दहा हजार तीनशे दहा
- नाशिक- 695
- दिंडोरी – 150
Published on: 18 July 2021, 10:28 IST