Maharashtra Ministers Portfolio: शिंदे-फडणवीस सरकार मंत्रिमंडळ विस्तार झाला. पण शिंदे गटात (Shinde Group) नाराजीचा सूर उमटल्याची चर्चा होती. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आपल्या खात्याबद्दल काहीशी नाराजी व्यक्त केली होती.
पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्याकडे असलेल्या खात्यांची जबाबदारी या आठ मंत्र्यांवर देण्यात आली आहे.
100 रुपये गुंतवा आणि मिळवा 75 हजार रुपये; जाणून घ्या योजनेबद्दल...
१. दादा भूसे- पणन
२. तानाजी सावंत- मृद व जलसंधारण
३. उदय सामंत – माहिती आणि तंत्रज्ञान
४. दीपक केसरकर- पर्यावरण व वातावरणीय बदल
५. शंभूराज देसाई- परिवहन
६. संदीपान भुमरे- अल्पसंख्याक व औकाफ
७. अब्दुल सत्तार – आपत्ती व्यवस्थापन
८. संजय राठोड- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
पहिल्या टप्प्यात भाजप आणि शिंदे गटाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण 18 मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह 20 जणांचं हे मंत्रिमंडळ आहे.
PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना सरकारने दिली 'ही' मोठी सवलत; जाणून घ्या
Published on: 17 August 2022, 10:15 IST