सोयाबीन-कापूस प्रश्नी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत रविकांत तुपकरांची मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहावर बैठक पार पडली .या बैठकीत सोयाबीन-कापूस प्रश्नी सविस्तर चर्चा झाली असून सोयाबीन उत्पादकांना दिलासा देण्यासाठी लवकरात-लवकर ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन पियूष गोयल यांनी दिले आहे असे तुपकर यांनी म्हटले आहे. जर सरकारने पुढील आठवडा भरात ठोस निर्णय घेवून शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही, तर १५ डिसेंबर नंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा स्फोट होईल, असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे.
अतिवृष्टी, गारपीटीसह ढगाळ वातावरण व हवामानातील बदलामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून १००% नुकसान भरपाई देण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.तसेच दूध उत्पादकांना अनुदान देण्याची, व दूध भुकटीला निर्यात अनुदान देण्याची मागणीही यावेळी केली त्यावर अधिवेशनात निर्णय घेण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असे तुपकर यांनी म्हटले आहे.
तसेच या बैठकीत कांदा निर्यातबंदी व इथेनॉल बंदीवरही या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. तसेच, आपल्या मागण्यांसाठी सरकारला 8 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. या पार्श्वभूमीवर जर सरकारने पुढील आठवडा भरात ठोस निर्णय घेवून शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही, तर १५ डिसेंबर नंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा स्फोट होईल, असा इशारा रविकांत तुपकरांनी सरकारला दिला आहे.
Published on: 11 December 2023, 06:05 IST