News

7th Pay Commission: देशातील 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना केंद्र सरकार पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढवण्याची मोठी भेट देऊ शकते, अशी बातमी सध्या प्रसार माध्यमांमध्ये झळकत आहे.

Updated on 07 July, 2022 3:55 PM IST

7th Pay Commission: देशातील 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना केंद्र सरकार पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढवण्याची मोठी भेट देऊ शकते, अशी बातमी सध्या प्रसार माध्यमांमध्ये झळकत आहे.

अहवालानुसार, जुलैपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) आणि पेन्शनधारकांच्या महागाई सवलतीत (DR) 6 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. सध्या तरी त्याची घोषणा झालेली नाही. जर डीएमध्ये 6 टक्के वाढ झाली तर कर्मचाऱ्यांचा पगार सुमारे 41,000 रुपयांनी वाढेल.

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 34 टक्के दराने डीए मिळत आहे, जर सरकारने जुलैपासून डीए 6 टक्क्यांनी वाढवला तर तो 40 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 12,960 रुपयां पासून ते 40,968 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. सरकारने कोणतीही पुष्टी केली नसली तरी, हा अंदाज AICPI निर्देशांक 2022 वरून काढण्यात आला आहे.

अखिल भारतीय ग्राहक मूल्य निर्देशांकाच्या आधारे सरकार जुलैमध्ये डीए 6 टक्क्यांनी वाढवू शकते असे सांगण्यात येत आहे. एआयसीपी इंडेक्सच्या आकडेवारीनुसार, जानेवारी महिन्यात हा आकडा 125.1 होता, तर फेब्रुवारीमध्ये तो 125 वर होता. तर मार्चमध्ये ते 126 पर्यंत वाढले. त्याचवेळी एप्रिलमध्ये AICPI निर्देशांक 127.7 अंकांवर खाली आला आहे.

त्याच वेळी, निर्देशांकाचा आकडा मे महिन्यात 129 पर्यंत वाढला आहे. या महिन्यातही हा आकडा वाढला तर डीए 6 टक्क्यांनी वाढू शकतो. आगामी काळात महागाई भत्ता 6 टक्क्यांनी वाढेल असा अंदाज आहे. परंतु, मे आणि जूनचे आकडे येणे बाकी आहे.  अशा परिस्थितीत हा निर्देशांक 129 च्या पुढे गेला तर महागाई भत्त्यात 6 टक्क्यांनी वाढ होऊ शकते.

पगारात बंपर वाढ होणार

जर आपण किमान मूळ वेतन 18,000 रुपये पकडले, तर वार्षिक महागाई भत्त्यात 40 टक्के दराने एकूण 12960 रुपये वाढ होईल. याचा अर्थ सध्याचा महागाई भत्ता दरमहा 1080 रुपयांनी वाढणार आहे. एकूण, 18000 रुपये मूळ वेतन असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना वार्षिक 86,400 रुपये महागाई भत्ता दिला जाईल.

दुसरीकडे, जर आपण कमाल मूळ वेतन 56900 रुपयाचा विचार केला तर, वार्षिक महागाई भत्त्यात एकूण वाढ 40968 रुपये होईल. म्हणजेच सध्याच्या महागाई भत्त्याच्या तुलनेत दरमहा 3414 रुपये वाढणार आहेत. एकूण 56900 रुपये मूळ वेतन असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना वार्षिक 2,73,120 रुपये महागाई भत्ता दिला जाईल.

English Summary: 7th pay commission latest update for employees
Published on: 07 July 2022, 03:55 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)