भारतातील केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (central employees) एक आनंदाची आणि अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जर तुम्हीही केंद्रीय कर्मचारी (Central staff) असाल तर आजची ही बातमी खास तुमच्यासाठी.
सातव्या वेतन आयोगांतर्गत महागाई भत्त्याबद्दल बोलायचे झाले तर सरकारने यात 3% वाढ केली आहे. आता 6व्या आणि सहाव्या वेतन आयोगाच्या कर्मचाऱ्यांनाही एक अनोखी भेट मिळाली आहे.या कर्मचार्यांचा डीएमध्ये तब्बल 13 टक्के वाढ होणार आहे.
म्हणजेच आता या कर्मचाऱ्यांना खरं पाहिल तर उर्वरित केंद्रीय कर्मचाऱ्यांइतकाच महागाई भत्त्याचा लाभ दिला जात आहे. वास्तविक, केंद्रीय कर्मचार्यांमध्ये असे अनेक कर्मचारी आहेत ज्यांना आतापर्यंत 7व्या वेतन आयोगाचा लाभ दिला जात नाही.
वित्त मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, जर आपण 5 व्या वेतन आयोगाअंतर्गत पगारदार कर्मचार्यांचा वाढवल्यानंतर डीए 381 टक्के होणार आहे.
तर 6 व्या वेतन आयोगांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांचा डीए 196 टक्क्यांवरून 203 टक्के करण्यात येत आहे. म्हणजेच 7% ने वाढणार आहे.
या कर्मचाऱ्यांना डीए वाढवण्याचा फायदा जानेवारी 2022 पासून लागू होणार आहे. या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांची थकबाकीही दिली जाणार आहे.
आतापर्यंत या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळत नव्हता. केंद्रीय विभाग किंवा स्वायत्त संस्थांमध्ये काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांचा सातव्या वेतन आयोगात समावेश झालेला नाही.
मात्र वित्त मंत्रालयाच्या या घोषणेनंतर 5व्या आणि 6व्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा विचार केला तर या कर्मचाऱ्यांना 7 ते 13 टक्के भत्ता एकरकमी दिला जात आहे. या घोषणेमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार आहे.
Published on: 12 May 2022, 04:57 IST