News

सध्या महावितरणकडून कृषी वीजवाहिन्यांचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये तीन हजार कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करण्यात येणार आहे.

Updated on 21 November, 2022 10:48 AM IST

सध्या महावितरणकडून कृषी वीजवाहिन्यांचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये तीन हजार कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करण्यात येणार आहे.

यासाठी 15 हजार एकर जमिनीवरून सुमारे चार हजार मेगावॅट विजेची निर्मिती करण्याची योजना आहे. दरम्यान, जास्तीत जास्त जमीन वीज प्रकल्पासाठी उपलब्ध व्हावी म्हणून महावितरणने भाडेवाढ केली आहे.

यामुळे आता जमीन भाड्याने देणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. सौर प्रकल्पांसाठी वीज उपपेंद्राच्या परिसरातील जमीन महावितरणने भाडय़ाने घेतली आहे. त्यासाठी प्रतिहेक्टरला वार्षिक 75 हजार रुपये भाडे देण्याचा निर्णय घेतला आहे.

सफरचंदापेक्षाही महाग सीताफळ, डझनचा दर 400 रुपयांवर..

दरम्यान, हा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी महावितरणने ऑनलाईन लॅण्ड पोर्टल सुरू केले आहे. यामध्ये सर्व प्रकारची माहिती मिळणार आहे. जमीन तातडीने उपलब्ध व्हावी, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.

काय सांगता! गायींना गाणी ऐकवली तर ५ लिटर दूध जास्त देतात, तरुणाने केले सिद्ध

यासाठी प्रत्येक जिह्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. कृषी वाहिनी योजनेसाठी घेण्यात येणारी जमीन महावितरणच्या वीज उपपेंद्राच्या पाच किलोमीटर परिघात असणे बंधनकारक आहे. रक्कम वाढल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो आता इनवेल बोअरिंग साठी मिळणार २० हजार रुपये
शेतकऱ्यांनो देशी गाईच्या शेणापासून तयार करा पणत्या, लाखोंमध्ये होतेय कमाई, जाणून घ्या..
काय बोलता! हा चहा मिळतोय ९ कोटी रुपयांत एक किलो, वाचा काय आहे खासियत..

English Summary: 75 thousand land for solar project, relief farmers..
Published on: 21 November 2022, 10:48 IST