News

Kadba Kutti Machine Anudan: शेतीमध्ये दिवसेंदिवस नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. अनेक शेतकरी आता आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. बहुतांश शेतकरी आपल्या शेतीतून उत्पन्न कमी येत आल्यास जोडधंदा म्हणून, पशुपालन व्यवसाय किंवा दुग्धव्यवसाय करून चांगली कमाई करतात.

Updated on 09 January, 2023 2:35 PM IST

Kadba Kutti Machine Anudan: शेतीमध्ये दिवसेंदिवस नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. अनेक शेतकरी आता आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. बहुतांश शेतकरी आपल्या शेतीतून उत्पन्न कमी येत आल्यास जोडधंदा म्हणून, पशुपालन व्यवसाय किंवा दुग्धव्यवसाय करून चांगली कमाई करतात.

शेतकऱ्यांना जनावरे सांभाळण्यासाठी हिरवा चारा व सुकलेला चाऱ्याची आवश्यकता असते. शेती करता करता येणारे पीक किंवा चारा पिके यांपैकी आपण काही जनावरांना चारा म्हणून खायला देत असतो.हा चारा आपण जनावरांना कापून टाकतो. (kadba kutti machine subsidy in maharashtra)

आपण जो चारा कापतो तो व्यवस्थितपणे कापल्या जात नाही. यामुळे जनावरांना खाण्यास अडचण होते व चारा देखील तसाच पडून जातो. यासाठी जनावरे पाळणाऱ्यांना व शेतकऱ्यांना कुट्टी मशीनची आवश्यकता असते. पण सर्वांनाच कडबा कुट्टी मशीनची किंमत जास्त असल्याने खरेदी करणे शक्य होत नाही.

असा करा अर्ज

सर्वप्रथम पुढील लिंकवर क्लिक करा https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login
तुम्ही रजिस्ट्रेशन करेल असेल तर युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा. रजिस्ट्रेशन करेल नसेल तर रजिस्ट्रेशन करुन घ्या आणि नंतर लॉगिन करा.
आधार नंबरला लिंक केलेल्या मोबाईल नंबरवरुन ओटीपी घेऊन देखील लॉगिन करू शकता.
आता अर्ज करा या बटणावर क्लिक करा.
सिंचन साधने व सुविधा या पर्यायावर क्लिक करा.
आता अर्ज ओपन होईल. अर्जात विचारलेली माहिती व्यवस्थितपणे भरा.
अर्जामध्ये मुख्य घटक या पर्यायासाठी सिंचन साधने व सुविधा हा पर्याय निवडा.
बाबीमध्ये पंपसेट इंजिन व मोटर हा पर्याय निवडा.
किती क्षमतेचा सिंचन पंप तुम्हाला हवा ते निवडा.
सर्वात शेवटी जतन बटणावर क्लिक करा. तुमचा अर्ज सबमिट होऊन जाईल.
अर्जाची पडताळणी केल्यानंतर तुम्हाला अनुदान दिले जाईल

शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना राबविल्या जातात. यानंतर, आता कडबा कुट्टी मशीनवर सुद्धा सरकार अनुदान देत आहे. kadba kutti machine information in marathi या अनुदानाचा फायदा देशातील अनेक शेतकरी बांधवांनी घेतला आहे. ही योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची ठरत आहे.

शेतकऱ्यांना व पशुपालकांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांना सरकारच्या योजनेअंतर्गत कमी खर्चात पैशांत चारा कापण्याचे यंत्र दिले जाणार आहे. अधिकाधिक पशुपालक आणि शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहचण्यासाठी सरकारने राष्ट्रीय पशुधन अभियान सुरू केले आहे.

English Summary: 75 percent subsidy is now available for Kadba Kutti Machine
Published on: 09 January 2023, 02:35 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)