News

पती आणि पत्नी ही संसाराची दोन चाके असतात असे म्हणतात. तरुण पण असो किंवा म्हातारपण पती आणि पत्नी चा मनाचा बंध हा कायमच असतो. कायम सुखात असो की दुःखात अगदी एकमेकांची साथ आयुष्यभर निभावली जाते.

Updated on 20 March, 2022 9:36 AM IST

पती आणि पत्नी ही संसाराची दोन चाके असतात असे म्हणतात. तरुण पण असो किंवा म्हातारपण पती आणि पत्नी चा मनाचा बंध हा कायमच असतो. कायम सुखात असो की दुःखात अगदी एकमेकांची साथ आयुष्यभर निभावली जाते.

याच गोष्टीचे प्रत्यंतर सध्या एका घटनेने आले आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती अशी की, पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात एका डॅशिंग 72 वर्षीय आजोबांनी चक्क स्वतःच्या पत्नीचा  जीव वाचवण्यासाठी बिबट्याशी नडण्याचा  पराक्रम केला.

नक्की वाचा:ऐकलं का! आता बांबूपासून तयार होईल इथेनॉल, नंदुरबार येथे होणार जगातला पहिला बांबू पासून इथेनॉल तयार करणारा प्रकल्प

याबाबतची घटना अशी की शुक्रवारी रात्री दहा वाजता मोखाडा तालुक्यातील पोशेरा ग्रामपंचायतीच्या हद्दीत पाराध्याची मेट  येथील शेतात राहणाऱ्या महिलेवर बिबट्याने हल्ला चढवला. परंतु  या वृद्ध महिलेच्या पतीने अतिशय धाडसाने आणि वेळेचे भान ठेवून स्वतः च्या पत्नीचे प्राण बिबट्याच्या तावडीतून सोडवले.

रात्रीच्या वेळी कसलातरी बाहेर आवाज येत असल्याने आवाज का येत आहे? याचा शोध घेण्यासाठी पार्वतीबाई सापटे  (65) या घराबाहेर आल्या असता बिबट्याने  अचानक त्यांच्यावर झडप धरली व त्यानंतर जीव वाचवण्यासाठी त्यांनी आरडाओरडा केला.

नक्की वाचा:जमिनीची कस म्हणजे तिचा कर्ब होय......                                                                              

त्यांचा हा आरडाओरडा ऐकून त्यांचे 72 वर्षीय पती काशिनाथ सापटे त्यांनी बाहेर येऊन बिबट्याचा प्रतिकार केला व आपल्या पत्नीला बिबट्याच्या  तावडीतुन सुखरूप सोडवले. या वृद्ध महिलेचा जीव वाचला परंतु त्या बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. 

विशेष म्हणजे हा हल्ला झाल्यानंतर बिबट्या काही वेळाने पुन्हा गावाकडे येताना दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन पाहणी केली व रात्रभर गस्त घातली. जखमी झालेल्या या वृद्ध आजीबाई वर  नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

English Summary: 72 years farmer save and escape from leopard attack to his wife
Published on: 20 March 2022, 09:36 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)