सध्या केळीची आवक कमी होत आहे. ही आवक पुढे आणखी कमी होईल. कारण कांदेबाग केळी बागांमधील काढणी पूर्ण होईल. सध्या खानदेशात (Khandesh) चोपडा, जळगाव, जामनेर, धुळ्यातील शिरपूर आदी भागांतील कांदेबाग केळीची काढणी (Banana Harvesting) पूर्ण होत आली आहे.
सध्या उशिरा लागवडीच्या बागांमध्ये काढणी सुरू आहे. सध्या कमी दर्जाच्या केळीला ७००, दर्जेदार केळीला १२०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. यामुळे दरामध्ये अजून सुधारणा होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
खानदेशात प्रतिदिन १६० ट्रक केळीची आवक होत आहे. या आवकेत मागील १५ ते १८ दिवसांत २० ट्रकनी घट झाली आहे. यामुळे दर स्थिर आहेत. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारातही प्रतिदिन १५० ट्रक केळीची आवक सध्या होत आहे. तेथेही कमाल दर १२०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल आहे.
उसाचे वजन आता मोफत करून मिळणार, काटामारीमुळे नेता उतरला मैदानात..
दरम्यान, काश्मीर, दिल्ली, पंजाबमधील खरेदीदार यावल तालुक्यातील फैजपूर, रावेरातील सावदा व परिसरातील एजंटच्या मदतीने केळीची चोपडा, जळगाव, पाचोरा, जामनेर व इतर भागांतून खरेदी करीत आहेत.
भारतीय अन्न आणि कृषी, जगाचे पॉवरहाऊस
दर्जेदार केळीची पाठवणूक पंजाब, दिल्ली येथील मॉल, काश्मीरमध्ये केली जात आहे. ज्या बागांत १० टनांपेक्षा अधिकची दर्जेदार केळी उपलब्ध होत आहेत, त्या बागांतील केळीला १५०० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिकचा दरही मिळत आहे. अनेक ठिकाणी याची मागणी आहे.
महत्वाच्या बातम्या;
काळ्या गव्हाची लागवड शेतकऱ्यांसाठी ठरतेय वरदान, होतोय बंपर नफा..
'ऊस लागवडीचा खर्च वाढला, साखर उद्योगाकडून शेतकऱ्यांचे शोषण'
मालदांडी ज्वारीला 5001 रुपयांचा दर
Published on: 10 November 2022, 11:05 IST