News

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर बारसू परिसरात गेल्या काही दिवसांपासून वातावरण चांगलंच तापले आहे. या परिसरातील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत कोणत्याही परिस्थितीत आम्ही सर्वेक्षण बंद पाडणारच अशी ठाम भूमिका हाती घेतली आहे.

Updated on 29 April, 2023 3:39 PM IST

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर बारसू परिसरात गेल्या काही दिवसांपासून वातावरण चांगलंच तापले आहे. या परिसरातील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत कोणत्याही परिस्थितीत आम्ही सर्वेक्षण बंद पाडणारच अशी ठाम भूमिका हाती घेतली आहे. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना सांगण्यात आल्यावरही आंदोलक माती परीक्षण होऊ न देण्यावर ठाम असल्याने पोलिसांनी देखील त्यांच्यावर लाठीमार केला होता यावरून विरोधी पक्ष नेते, तसेच शेतकरी संघटनेने तीव्र निषेद व्यक्त केला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ७० टक्केपेक्षा जास्त शेतकऱ्यांचा पाठिंबा या रिफायनरी प्रकल्पाला असल्याचा दावा केला आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री -
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, काल झालेल्या आंदोलनासाठी काही बाहेरून लोक आले होते. आता मात्र तिथे शांतता आहे. शिवाय पोलिसांनी लाठीमार केलेला नाही. शेतकऱ्यांवर अन्याय करून कुठलंही काम होणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.

सध्या उद्योगमंत्री उदय सामंत तिथल्या लोकांशी बोलत आहेत. अधिकारीदेखील शेतकऱ्यांना या प्रकल्पाची माहिती देतील, शेतकऱ्यांच्या संमतीनेच हा प्रकल्प पुढे जाईल,कारण हे सरकार सर्वसामान्यांच सरकारआहे, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

हा प्रकल्प आल्यास येथील स्थानिक नागरिकांनाच याचा फायदा होणार असल्याचं ते म्हणाले. ७० टक्के लोकांचा या प्रकल्पाला पाठींबा असताना देखील काहीजण विरोध करत आहेत. १०० टक्के विरोध असता तर मी समजू शकलो असतो मात्र इथे तर ७० टक्केपेक्षा जास्त लोकांनाच पाठींबा आहे. आता बारसू
लोकांनी शांतात राखावी असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

image credit - Sunilbhau Sawardekar (facebook ), eknath shinde (facebook )

अधिक बातम्या:
आनंदाची बातमी! अण्णासाहेब महामंडळाची ट्रॅक्टर योजना पुन्हा सुरू; कर्जमर्यादा १५ लाखांपर्यंत वाढवली
प्रशांत डिक्कर यांच्या श्राद्ध आंदोलनापुढं सरकार झुकलं; हरभरा खरेदीसाठी सरकारनं दिली परवानगी
पेरणी यंत्र योजनाद्वारे मिळणार तब्बल "एवढे" अनुदान, असा घ्या लाभ...

English Summary: 70 percent of farmers support the refinery project: Chief Minister Eknath Shinde
Published on: 29 April 2023, 03:34 IST