पुणे : पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत ६२% पाणीसाठा झाला असून, त्यामुळे पुणेकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. परंतु शेतीसाठी पाण्याचा प्रश्न अजून मिटला नाही. त्यासाठी धरणे पूर्ण क्षमतेने भरण्याची आवश्यकता आहे.
दरम्यान यावर्षी पुणे विभागातील सर्वात मोठे प्रकल्प यावर्षी रिकामीच आहेत. खडकवासला धरणसाखळीत, पानशेत, वरसगाव, टेमाघर आणि खडवासाला ही धरणे येतात. या धरणांची एकूण क्षमता २९ टीएमसी आहे. आजपर्यंत या चारही धरणात १८. १३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. या पाण्यामुळे पुणेकारांची वर्षाची पाण्याची व्यवस्था झाली आहे. परंतु शेतीसाठी धरणे पूर्ण भरायची गरज आहे.
जुलै महिना कोरडा गेल्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसानं जोर धरला आहे. दोन आठवड्यांपूर्वी पुणे महानगरपालिकेने पाणीकपात लागू केली होती. आता पाऊस पडल्यनानंतर पुणेकरांचा जीव भांड्यात पडला आहे.
Published on: 12 August 2020, 06:50 IST