नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत सन 2021-22 या वर्षासाठी विविध बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी 600 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली असल्याचे माहिती कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
या प्रकल्पांतर्गत वैयक्तिक लाभाच्या बाबी जसे की शेततळे, ठिबक संच, फळबाग लागवड तसेच इलेक्ट्रिक मोटर इत्यादी तसेच शेतकरी गटांना लाभ ( शेतीसाठी सोयीसुविधा व कृषी प्रक्रिया उद्योग) तसेच पाण्याचा ताळेबंद यावर आधारित मृद व जलसंधारणाची कामे अशा विविध बाबींचा समावेश आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प करिता बाह्यहिश्याचा रुपये चारशे वीस कोटी व राज्य हिस्साचा 180 कोटी असे एकूण 600 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात येत आहे. हा निधी पोखरा अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी कामे पूर्ण केली असतील त्यांना तात्काळ वर्ग करावा,असे स्पष्ट निर्देशही कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत.
हवामान बदलासाठी अतिसंवेदनशील असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील 4210 गावे तसेच विदर्भातील पूर्णा नदीच्या खोर्यातील खार पण त्यातील 932 गावे असे एकूण पाच हजार 142 गावांमध्ये सहा वर्षे कालावधीत जागतिक बॅंकेच्या अर्थसाहाय्याने रुपये चार हजार कोटी अंदाजित खर्चाचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावांमध्ये विविध बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी सन 2021 ते 22 मध्ये एकूण 730.53 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून निधी खर्ची पडलेला आहे.
या प्रकल्पांतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांनी शेतकरी गट तसेच शेतकरी कंपन्यांनी व ग्राम कृषी संजीवनी समितीने केलेल्या कामापोटी द्यावयाच्या अर्थ साहाय्यासाठी 33 अर्थसहाय्य उद्दिष्ट करिता बाह्य व राज्य हिस्सा असा एकूण 600 कोटी रुपये अतिरिक्त निधी पुरवणी मागणी द्वारे उपलब्ध झाला आहे. अशी माहिती कृषिमंत्री श्री.भुसे यांनी दिली.
Published on: 29 January 2022, 11:52 IST