News

गेल्या काही दिवसांपासून अनेक बदल होत आहेत. सर्वसामान्य लोकांना याचा फटका बसत आहे. देशभरात 1 जूनपासून अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर आणि आयुष्यावर होईल.

Updated on 01 June, 2022 2:50 PM IST

गेल्या काही दिवसांपासून अनेक बदल होत आहेत. सर्वसामान्य लोकांना याचा फटका बसत आहे. देशभरात 1 जूनपासून अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर आणि आयुष्यावर होईल.

1. एसबीआयचे कर्ज महागणार, व्याजदर वाढणार

दोन आठवड्यापूर्वी रिझर्व्ह बँकेने महागाई रोखण्यासाठी रेपो दरात अचानक वाढ केली होती. आरबीआयने रेपो दर ०.४० टक्क्यांनी वाढवला होता. त्यामुळे बँकांकडून हा भार ग्राहकांवर लादला जाईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. गेल्या आठवड्यात काही बँकांनी कर्जदरात वाढ केली होती.

2. दुचाकी, चारचाकी सह इतर मोठ्या वाहनांचा थर्ड पार्टी विमा महागणार

१ जूनपासून मोठ्या वाहनांसह दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा थर्ड पार्टी विमा महागणार आहे. म्हणजेच आता तुम्हाला थर्ड पार्टी इन्शुरन्ससाठी जास्त प्रीमियम भरावा लागेल. भारतीय विमा आणि नियामक आणि विकास प्राधिकरण ने मोटर वाहनांच्या थर्ड पार्टी इन्शुरन्सचे दर वाढवण्यासाठी मसुदा तयार केला आहे. नवीन दर 1 जून 2022 पासून लागू होणार आहेत.

Petrol-Diesel Price: पेट्रोल डिझेल दराबाबत ग्राहकांना दिलासा; जाणून घ्या आजची किंमत

3. सोन्याच्या हॉलमार्किंगचा दुसरा टप्पा सुरू होणार. ३२ नवीन जिल्ह्यांसह २८८ जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग बंधनकारक.

4. बचत खात्यात किमान २५ हजार ठेवावे लागणार. अँक्सिस बँकेने तसा नियम केला.

5. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेद्वारे व्यवहार करणेदेखील जून महिन्यापासून महाग होणार.

6. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडरचे दर किमती निश्चित करतात.

UPSC Result 2022: यूपीएससी परीक्षेत मुलींचाच डंका; वाचा राज्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची यादी

English Summary: 6 major changes across the country since June 1st
Published on: 01 June 2022, 02:50 IST