News

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब, तसेच APL शेतकरी लाभार्थी अशा रेशनकार्डमधील 7 कोटी 49 लाख नागरिकांपैकी 6 कोटी 52 लाख 32 हजार 448 लाभार्थ्यांना 20 लाख 72 हजार 104 क्विंटल गहू, 15 लाख 96 हजार 798 क्विंटल तांदूळ वाटप करण्यात आले.

Updated on 03 August, 2020 9:37 AM IST


राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब, तसेच APL शेतकरी लाभार्थी अशा रेशनकार्डमधील 7 कोटी 49 लाख नागरिकांपैकी 6 कोटी 52 लाख 32 हजार 448 लाभार्थ्यांना 20 लाख 72 हजार 104 क्विंटल गहू, 15 लाख 96 हजार 798 क्विंटल तांदूळ वाटप करण्यात आले. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी प्रति महिना 5 किलो अन्न-धान्य (गहू व तांदूळ) मोफत देण्याच्या योजनेमधून जुलै महिन्यासाठी आतापर्यंत 19 लाख 97 हजार 474 क्विंटल गहू आणि तांदळाचे वाटप झाले, याविषयीची माहिती अन्न व वितरण पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

स्थलांतरित झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे 3 लाख 71 हजार 482 शिधापत्रिका धारकांमार्फत ते जेथे राहत आहे त्याठिकाणी पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत अन्नधान्याची उचल केली आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी प्रति महिना 5 किलो तांदूळ मोफत देण्यात येते. या योजनमधून दि. 6 जून पासून जून महिन्यासाठी आतापर्यंत 32 लाख 435 क्विंटल तांदळाचे वाटप झाले आहे.  कोविड-19 संकटावरील उपाययोजनेसाठी 3 कोटी 8 लाख 44 हजार 76 एपीएल केसरी शिधापत्रिका असलेल्या लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 5 किलो धान्य सवलतीच्या दराने (गहू 8 रुपये प्रति किलो व तांदूळ 12 रुपये प्रति किलो) देण्याचा निर्णय घेतला आहे.

या धान्याचे आतापर्यंत 13 लाख 4 हजार 46 क्विंटल मे व जून महिन्यासाठी वाटप केले आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रति रेशनकार्ड 1 किलो तूर किंवा चना हरभरा डाळ मोफत देण्याची तरतूद आहे. आतापर्यंत या योजनेतून सुमारे 3 लाख 89 हजार 792 क्विंटल डाळीचे एप्रिल ते जून महिन्यासाठी वाटप केले आहे. आत्मनिर्भर भारत या योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिका धारकांना प्रति व्यक्ती 5 किलो मोफत तांदूळ दिला जातो. आतापर्यंत या योजनेतून 1 लाख 35 हजार 308 क्विंटल तांदूळ मे व जून महिन्यासाठी वितरित केला आहे.
दरम्यान १ जुलै ते २५ जुलैपर्यंत राज्यातील १ कोटी लाख ४८ हजार ६२६ शिधापत्रिका धारकांना ३७ लाख ३ हजार ७९३ क्किंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले होते.

English Summary: 56 lakh quintals of foodgrains distributed in July; 6 crore beneficiaries got benefits
Published on: 03 August 2020, 09:37 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)