News

हळूहळू करत पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं

Updated on 13 August, 2022 2:01 PM IST

हळूहळू करत पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं असून दिल्लीत रुग्णसंख्या दररोज वाढतच आहे.यामुळे पॉझिटीव्हिटी रेट कमी करण्यासाठी दिल्ली सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये पुन्हा मास्कसक्ती केली असल्याची बातमी समोर आली आहे. 

दिल्लीमध्ये आता सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक करण्यात आला आहे.Masks have now been made mandatory in public places in Delhi. दिल्लीमधील अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने निर्णय घेतला असला तरी विशेष म्हणजे कारमधून जे लोक प्रवास करतात,अशा लोकांना मास्क (Mask) बंधनकारक नसणार आहे. म्हणजेच कारमधून दिल्लीतील लोक मास्क न लावता प्रवास करु शकतात; पण सार्वजनिक ठिकाणी मात्र मास्क बंधनकारक असणार आहे.

मास्क न घातल्यास होणार दंड.?देशामध्ये कोरोना रुग्णसंख्या कमी झाली असली तरी अनेक राज्यांच्या सरकारने मास्क लावण्याची सूचना दिली होती. पण नागरिकांनी आवश्यकता असताना तो लावला नाही आणि हा नियम ऐच्छिक असताना बंधनं शिथिल केले की कोणाला कोरोना गेला की काय असं वाटल्याने कोरोनाच्या सक्रिय रुग्णांमध्ये अधिक वाढ होऊन रुग्णसंख्या वाढल्याने दिल्ली सरकारने नागरिकांकडून 500 रुपये दंड आकारणी सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्यास सुरू केली आहे.

मागील काही दिवसांपासून दिल्लीत कोरोना वेगात वाढत आहे. मागील 24 तासांमध्ये दिल्लीत 2146 रुग्ण आढळले आहेत, तर 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिल्लीतील कोरोनाचा पॉझिटीव्हीटी रेट 15.41 टक्के होता. केवळ ऑगस्टमध्येच दिल्लीत कोरोनामुळे 40 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत आतापर्यंत 26,351 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही कोरोना रुग्णांची काल दिवसभरात राज्यात 1 हजार 847 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 7 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. इतर राज्यांतील परिस्थिती पाहता देखील रुग्णसंख्या वाढत आहे, यामुळे कडक बंधनं न लादता मास्कसक्तीवर निर्णय इतर राज्यात देखील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे . यामुळे आता नागरीकांची धाकधूक पुन्हा वाढली आहे.

English Summary: 500 rupees fine for not wearing a mask, this government has decided
Published on: 13 August 2022, 02:01 IST