पुणे जिल्ह्यातील भिमा पाटस कारखान्यामध्ये ५०० कोटींचे मनी लॅंडरींग झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेटर लिहीले असून आता याची चौकशी करा अशी मागणी केली आहे. हा कारखाना भाजप आमदार राहुल कुल यांच्या संबंधीत आहे.
याबाबत संजय राऊत यांनी या संदर्भात ट्विटरवर ट्विट करत आज सकाळीच राज्यभरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. दरम्यान भाजपच्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेचे मुख्य सूत्रधार किरीट सोमय्या यांच्या स्वतंत्र यंत्रणेमार्फत भिमा पाटस सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराची माहिती घ्या, असाही सल्ला खासदार राऊत यांनी केला आहे.
यामुळे आता चौकशी होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोमय्या यांच्या कार्यालयात तक्रारदार हे प्रकरण घेऊन गेले, मात्र किरीट सोमय्या या भ्रष्टाचारावर मूग गिळून गप्प बसले, जनतेच्या पैशाची प्रचंड लूटमार या कारखान्यात झाली आहे, हे सर्व प्रकरण ईडी व सीबीआयच्या ताब्यात देऊन भिमा सहकारी साखर कारखान्यातील घोटाळेबाजांवर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील भिमा सहकारी साखर कारखान्याने गेल्या काही वर्षात केलेल्या गैरव्यवहाराचे प्रकरण हे सरळसरळ ५०० कोटींचे मनी लॅंडरींग असल्याचा आरोप केला आहे.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या कारखान्याचे प्रकरण चर्चेत आहे, तेथे तपास यंत्रणेच्या धाडी पडत आहेत, मात्र त्यापेक्षा भयंकर प्रकरण तर भिमा पाटस कारखान्याचे आहे. यामुळे आता चौकशी केली जाणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राज्यात पुन्हा एकदा पावसाचा इशारा, 13 ते 15 मार्चला पावसाची शक्यता
या कारखान्यातील शेकडो कोटींचा गैरव्यवहार यापेक्षा भयंकर आहे, मात्र या भ्रष्टाचारास राजकीय संरक्षण मिळत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या आरोपामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. आमदार राहुल कुल हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात.
लिटरला 1500 हजार रुपये! ही शेती शेतकऱ्यांना करणार मालामाल..
भटक्या गायींपासून सुटका होणार, गोशाळा करू शकतील नवीन व्यवसाय, नीती आयोगाची नवीन योजना
मोठी बातमी! भाजपच्या ताब्यात असलेल्या साखर कारखान्याला जप्तीचे आदेश, काय आहे प्रकरण?
Published on: 13 March 2023, 09:32 IST