मुंबई : पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबातील वारसांना ५० लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत केली. तत्पूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबांतील मुलांच्या शिक्षणाकडे, रोजगाराकडे राज्य सरकार लक्ष देणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच मृतांपैकी ज्यांच्या कुटुंबात रोजगाराचा प्रश्न आहे, त्यांच्या थेट वारसांना शासकीय नोकरी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आपल्या विशेषाधिकारात जाहीर केला. हल्ल्यातील मृतांपैकी जगदाळे यांच्या कुटुंबातील मुलीला नोकरी देण्याचा निर्णय कालच मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी जाहीर केला होता.
२२ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास पहलगाम येथे दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात आतापर्यंत जवळपास २९ जणांच्या मृत्यू झाल्या आहे. तसेच मृत्यूचा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे. तर महाराष्ट्रातील ६ जणांच्या या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर हल्ला करण्यात आला. यात महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यात डोंबिवलीमधील तीन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. पनवेलमधील एक आणि पुण्यातील २ जणांचा मृत्यू झाला.
Published on: 29 April 2025, 04:52 IST