मुंबई : शेती हा भारताचा प्रमुख व्यवसाय म्हणून ओळखले जाते. नांगरणीला शेतीचा कणाच म्हटले तर वावगे ठरणार नाही. शेतीची मशागत करतांना पहिल्यांदा नांगरणीपासूनच सुरवात करावी लागते. त्यामुळेच शेतीची नांगरणी खूप महत्त्वाची मानली जाते.
शेतीची मशागत सध्याच्या परिस्थितीत सर्वत्र ट्रॅक्टरच्या माध्यमातून होत आहे. मालक ट्रॅक्टरने मशागत करताना केव्हा केव्हा नजर चुकीने किंवा जाणीवपूर्वक बांध कोरला जातो. यामुळे दोन शेतकरी शेजाऱ्यामध्ये वाद निर्माण होतो. याला काही प्रमाणात ट्रॅक्टरचालक ही जबाबदार असतात.
त्यामुळे शेतीची नांगरणी करताना दोन फूट जागा सोडून नांगरणी करावी. मशागतीवरून वाद उद्भवला तर ट्रॅक्टर चालक व मालकावरही गुन्हा नोंद होऊ शकतो. तेव्हा ट्रक्टर मालकांनी ती जमीन वादग्रस्त आहे की नाही याची शहानिशा करून मगच नांगरणी करावी हे हिताचे राहील.
अन्यथा शेतीचे वाद वाढतील व ट्रॅक्टर चालक व मालकावर गुन्हा दाखल होऊन पाच वर्षे पर्यंत शिक्षा होऊन ट्रॅक्टर जप्त केले जाऊ शकते. अशी कायद्यात तरतूद करण्यात आली असल्याचे नोटीशीद्वारे कळवण्यात आले आहे.
जमीन मशागतीची उद्दिष्टे :
१. जमीन पेरणी योग्य, सपाट बनविणे.
२. जमिनीचा फुल वाढविणे.
३. जमिनीत हवा खेळती रहावी.
४. जमिनीचे तापमान वाढून त्यातील उपद्रवी किटकाचा नाश होणे.
५. तण नियंत्रणजमीन सुपीकता वाढावी.
६. जमिनीवरील चिकण व क्षार कणाचा थर नाहीसा व्हावा.
Published on: 02 June 2022, 04:13 IST