पुणे जिल्हयातील राजगुरूनगर तालुक्यात पिसाळलेल्या रानटी डुकराने केलेल्या हल्ल्यात पाच मजुर जखमी झाले आहेत. सोनाळे गावातील जंगलात कामासाठी मजूर जात असताना हा हल्ला झाला. हल्ला एवढा गंभीर स्वरुपाचा होता की त्यात जखमी झालेल्या मजुरांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बाळू रायात, रोहिदास रायात, अनंता पवार, काशिनाथ रायात व वनिता रायात अशी जखमी असलेल्या मजुरांची नावे आहेत. सोनाळे गावातील जंगल परिसरात सोनाळे बु.ते नंबर पाडा या रस्त्याचे काम रोजगार हमी योजनेतून सुरू आहे. उन्हाळ्यातील शेतीची कामे संपल्याने हे मजूर या रस्त्याच्या कामाला जात असताना हा हल्ला झाला.
चिंताजनक : महाराष्ट्रात दोन दिवस गारपिटीची शक्यता
दुपारी जेवणासाठी गावात काही मजूर जेवायला येते असताना पिसाळलेल्या रानटी डुकराने हल्ला करून त्यांना जखमी केले. जखमीवर वाडा ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डाॅ. किरण पाटील यांनी दिली.
Weather Update : मेघराजा यंदाही चांगलाच बरसणार...
दरम्यान, परिसरातील शेतकरी भीतीच्या छायेत असून वनविभागाने पिसाळलेल्या डुकराला जेरबंद करावे अशी मागणी सोनाळे ग्रामस्थांनी केली आहे. तर बिबट्या नंतर आता रानटी डुक्करे देखील हल्ला करू लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शिवाय कोणत्याही वन्यजीवाची हत्या झाल्यास अथवा त्याला इजा केल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल होता.
कांदा दराचा प्रश्न मिटणार; कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने ठरवली रणनिती
मात्र, गरीब मुजुरांवर हल्ला झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल शेतकरी करत आहेत. शिवाय हातावर पोट असणाऱ्यांवर असे हल्ले झाल्यास इलाजासाठी पैसे कोठून आणायचे? दुर्दैवाने कुटुंबप्रमुख दगावला गेल्यास त्यांच्या कुटुंबाच्या भविष्याचे काय? असे विविध प्रश्न येथील गरीब शेतकऱ्यांना सतावत आहेत.
Skymet : वेधशाळेचा अंदाज आला रे; महाराष्ट्रात असा असणार मान्सून...
Published on: 13 April 2022, 03:30 IST