1) मनोज जरांगे यांनी उपोषण घेतलं मागे
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात सुरू असलेले मनोज जरांगे यांनी उपोषण मागं घेतलंय.. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली.. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिल्यानंतर १७ व्या दिवशी त्यांनी हे उपोषण मागे घेतलंय.. यावेळी मुख्यंमत्री शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री देखील जरांगे यांना भेटण्यासाठी उपस्थित होते..मुख्यंमत्री शिंदे यांच्या हातून ज्यूस पिऊन हे उपोषण मागे घेण्यात आलंय...तसंच माझ्यावर विश्वास ठेवा. मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना दिलंय..त्यामुळे जरांगे पाटील यांनी हे उपोषण मागं घेतलंय... आहे..
2) बैलपोळ्यावर दुष्काळ, लम्पीचं सावट
आज बैलपोळा सण... पण या सणावर राज्याच्या काही दुष्काळ आणि लम्पी संसर्गाचं सावट आलंय.. त्यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झालाय.. बैलपोळा हा सण शेतकऱ्यांसाठी आनंदाचा असतो..शेतकऱ्यांसोबत शेतात वर्षभर राबणाऱ्या बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो.. त्यामुळे शेतकरी हा दिवस जोरदार साजरा करतात.. तसंच या दिवशी शेतकरी आपल्या सर्जा राजाची पूजा करुन त्याला पुरणपोळी भरवतात.. या दिवशी कोणताच शेतकरी बैलाला खांद्यावर ओझे देत नाही..
3) ऐन पावसाळ्यात कोकणातील आंबा कलमांना मोहोर
ऐन पावसाळ्यात सिंधुदुर्गात आंबा कलमांना मोहोर आलाय.. वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे, किल्ले निवती भागात हापूसची फळधारणा झाल्याचं चित्रं पहायला मिळतंय.. यामुळे आंबाच्या सिजन लवकर सुरु होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.. भर पावसाळ्यात हापुस आंब्यांना मोहोर आल्याने थोडंस आश्चर्य सर्वांना वाटतयं.. तसंच हा मोहोर आंबा बागायतदारांनी आच्छादन टाकून टिकवून ठेवल्यास आंबा उत्पादकांना याचा नक्कीच फायदा होणार आहे..
4) कपाशीवर आकस्मिक ‘मर’ रोगाचा प्रादुर्भाव
रखडलेल्या पावसामुळे कापूस उत्पादनाची थोडीबहुत आशा लागून असलेल्या कपाशीवर आकस्मिक ‘मर’ रोगाचा प्रादुर्भाव झालाय..त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांसमोर संकट उभं राहिलंय.. यंदा मराठवाड्यात कपाशीची अपेक्षित लागवड झाली नाही. त्यात पावसाने पिकांचा चांगलाच खेळ मांडला. ऐन वाढीच्या अवस्थेत पावसाने दांडी दिल्यामुळे कपाशीची वाढ खुंटली. त्यातच सातत्याने पावसाचा खंड असल्यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे..
5) राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
आज पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा आहे. गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यात ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. उर्वरित विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.,. राज्यात पावसाच्या उघडीपीने उन्हाचा चटका वाढला आहे. ढगाळ हवामानासह उकाड्यामुळे नागरिक हैराण झालेत..पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय..
Published on: 14 September 2023, 04:54 IST