१.एम.एस स्वामिनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर
२.राज्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता
३.खानदेशात पपईला मिळतोय ९ रूपये प्रतिकिलो दर
४.लाल मिरची दरात २० ते २५ टक्क्यांची वाढ
५.पीक विम्यासाठी 'सारथी' पोर्टल
१.एम.एस स्वामिनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर
हरित क्रांतीचे जनक एम.एस स्वामिनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला आहे.त्यांची कृषी क्षेत्रातील कामगिरी ही उल्लेखनीय आहे. कृषी क्षेत्रात दिलेल्या त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट द्वारे याबाबतची माहिती दिली आहे.डॉ. एम एस स्वामीनाथन यांनी कृषी आणि शेतकरी कल्याणात आपल योगदान दिलं आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना आता मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात येत आहे. याचा अत्यंत आनंद असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विट च्या माध्यमातुन व्यक्त केल आहे . दरम्यान डॉ. एम एस स्वामीनाथन यांच्याबरोबर माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग माजी पंतप्रधान नरसिंह राव यांना देखील भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन याबाबतची ही माहिती दिली आहे.
२.राज्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता
राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे.उर्वरित राज्यात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे.उत्तर भारतात थंडी कायम राहणार असुन राज्यात विदर्भासह मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.देशाची राजधानी नवी दिल्लीत आज म्हणजेच शनिवारी किमान तापमान 08 अंश आणि कमाल तापमान 23 अंशांवर नोंदवले जाऊ शकते. यासोबतच सकाळी हलके धुकेही पाहायला मिळते. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, दिल्लीत उन्हामुळे तापमान वाढू लागले आहे.पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, उत्तराखंड, राजस्थान, उत्तरप्रदेश, बिहार झारखंडमध्ये किमान तापमान ५ ते १० अंशांच्या दरम्यान आहे अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत दिल्लीच्या कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.त्यासोबतच आज महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
३.खानदेशात पपईला मिळतोय ९ रूपये प्रतिकिलो दर
खानदेशात मागील काही दिवसांपुर्वी पपई दर कमी झाले होते आता पपई दरात मागील चार ते पाच दिवसांत किलोमागे सुधारणा झाली असल्याचे पाहायला मिळत आहे.नंदुरबारातील अनेक भागात पपई आवकेत मोठी घट झाली आहे.शेतकऱ्यांना साडेनऊ रुपये प्रतिकिलो पपई मिळत आहेत. दरात सतत सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.पपई दरात तब्बल अडीच महिन्यानंतर चांगली दरवाढ झाली आहे. पाठवणूक पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाना, राजस्थान येथे करण्यात येत आहे.मागील काही दिवसांत पपई दरात एक किलोमागे रोज २५ पैसे ते ५० पैसे सुधारणा झाली. जानेवारीत पपई दर पाच रुपये प्रतिकिलो होते. सध्या साडेनऊ रुपये प्रतिकिलोचा दर आहे.कमी दर्जाच्या पपईचे दर साडेसात रुपये प्रतिकिलो आहेत. सध्या दर्जेदार पपई सर्वत्र उपलब्ध आहे.
४.लाल मिरची दरात २० ते २५ टक्क्यांची वाढ
लसणानंतर आता सुकी लाल मिरची सर्वसामान्यांचे बजेट बिघडू शकते.सद्या लाल मिरचीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. निर्यात आणि मागणी वाढल्याने सुक्या लाल मिरचीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे दरात २० ते २५ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. त्याचबरोबर येत्या काही दिवसांत सुक्या लाल मिरचीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या प्रमुख लाल मिरची उत्पादक राज्यांतील शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. त्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल. सध्या मंडयांमध्ये सुक्या लाल मिरचीचे दर १५० रुपये किलो ते १९० रुपये किलो दरम्यान आहेत.
५.पीक विम्यासाठी 'सारथी' पोर्टल
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक पोर्टल सुरू केलय.केंद्र सरकारनं गुरुवारी सारथी पोर्टल सुरू केलं आहे तर या पोर्टलवरून विमा कंपन्या आणि शेतकरी यांच्यात समन्वय साधण्यात येणार आहे.आता त्यासाठी १४४४७ हेल्पलाईन नंबरही सुरू करण्यात आला. कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी सांगितलं की, पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या तक्रारी या हेल्पलाईन नंबरवर नोंदवू शकतात.आशी माहीती रितेश चौहान यांनीही याबद्दल माहिती दिली.यावेळी ते म्हणालेत, एकाच वेळी शेतकरी विमा कंपनी, बँक आणि कॉमन सर्व्हिस सेंटर यांच्यातील अंतर कमी करण्याचं काम सारथी पोर्टल करेल या पोर्टलवरून पीक विम्याच्या प्रीमियमबद्दल माहिती मिळणार आहे. तसेच नुकसान भरपाईचा दावा शेतकरी करू शकतात. पीक विम्याची ट्रॅकिंगही करता येणार आहे. त्यामुळं पीक विमा योजनेत पारदर्शकता येईल. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल, असा दावा कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी केला.
Published on: 10 February 2024, 03:15 IST