News

राज्य सरकारने यंदा परराज्यात पाठवणाऱ्या ऊसावर बंदी घातली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळे या बंदीचा आदेश तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली.

Updated on 21 September, 2023 11:50 AM IST

१) नाशिकमधील कांद्याचे लिलाव दुसऱ्या दिवशीही बंद
नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे लिलाव आज दुसऱ्या दिवशी ठप्प आहेत. यामुळे बाजार समितीत शुकशुकाट पाहायला मिळत आहे. या बंदचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी घेतलेल्या भुमिकेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने कठोर कारवाईचे आदेश देण्यात आलेत. तसंच बंदमध्ये सहभागी होणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने आणि गाळे जप्त करण्यात यावेत, असे आदेश पणन खात्याकडून बाजार समितीला देण्यात आलेत. त्यामुळे व्यापाऱ्यांवर कोणती कारवाई होणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

२) 'ऊस बंदीचा आदेश मागे घ्यावा'
राज्य सरकारने यंदा परराज्यात पाठवणाऱ्या ऊसावर बंदी घातली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळे या बंदीचा आदेश सरकारने तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली. त्यावर सहकारमंत्री वळसे पाटील यांनीहा निर्णय तत्काळ मागे घेणार असल्याचे आश्‍वासन रयत क्रांती संघटनेला देण्यात आले आहे.

3) रत्नागिरीला पाणीपुरवठा करणारे जॅकवेल कोसळले
रत्नागिरीला पाणीपुरवठा करणारे जॅक वेल कोसळल्याची घटना घडली आहे. यामुळे पुढील काही दिवस शहराचा पाणी पुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे. जॅक वेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांची तात्काळ बाहेर उड्या मारल्यामुळे थोडक्यात ते बचावले आहेत. त्यामुळं मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र गणेशोत्सवाच्या काळात ही घटना घडल्याने रत्नागिरी शहरावर पाणी संकट उभं राहिलं आहे. आज पहाटेच्या सुमारास जॅक वेल कोसळले आहे. पावसामुळं जॅकवेलची जमीन खचल्याने ही घटना घडली आहे.

४) राज्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता
राज्यात पुढील तीन ते चार दिवस पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज पुणे हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. अरबी समुद्रात कमी दबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पुढील काही दिवस राज्यात पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. राज्यातील तुरळक ठिकाणी, गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोव्यातही काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. आज २१ सप्टेंबर रोजी संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.

५) राज्यातील शेतकरी आत्महत्या आलेख वाढताच
राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत्याच आहेत. मागील सहा महिन्यांत तब्बल १ हजार ५५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या करुन जीवन संपवले आहे. गतवर्षी २ हजार ९५४ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले. तर मागील काही वर्षांपासून शेतकरी आत्महत्यांचा आलेख वाढताच आहे. यामुळे कृषी क्षेत्रातून चिंता व्यक्त केली जात आहे. मदत व पुनर्वसन विभागाकडे असलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, मागील पाच वर्षांत प्रतिवर्षी अडीच हजार शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे.

English Summary: 5 important agriculture news in the state Find out what are the updates
Published on: 21 September 2023, 11:50 IST