News

यावर्षी एकनाथ महाराज यांच्या भागवत ग्रंथाला 450 वर्षे पूर्ण झाली आहे. यानिमित्ताने वारकरी संप्रदायाकडून आज पंढरपुर येथे भागवत ग्रंथाचा ग्रंथदिंडी सोहळा आयोजित करण्यात आली होती. या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी हजारो वारकऱ्यांनी पंढरपुरात गर्दी केली होती. यावेळी नामदेव पायरीपासून या सोहळ्याला सुरुवात झाली.

Updated on 15 October, 2023 4:43 PM IST

यावर्षी एकनाथ महाराज यांच्या भागवत ग्रंथाला 450 वर्षे पूर्ण झाली आहे. यानिमित्ताने वारकरी संप्रदायाकडून आज पंढरपुर येथे भागवत ग्रंथाचा ग्रंथदिंडी सोहळा आयोजित करण्यात आली होती. या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी हजारो वारकऱ्यांनी पंढरपुरात गर्दी केली होती. यावेळी नामदेव पायरीपासून या सोहळ्याला सुरुवात झाली.

450 वर्षांपूर्वीचा एतिहास -
450 वर्षांपूर्वी भागवत ग्रंथाचे काम पूर्ण झाल्यावर श्रीक्षेत्र काशी येथे एकनाथ महाराज आणि भागवत ग्रंथाची अशाच पद्धतीने हत्तीवरून मिरवणूक काढून सन्मान करण्यात आला होता. याच दिवसाच्या आठवणीनिमित्त आज वारकरी पाईक संघ आणि इतर वारकरी संघटनांकडून ही भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली.

सोहळा पाहण्यासाठी वारकऱ्यांची गर्दी -
प्रदक्षिणा मार्गावर दुतर्फा हजारो वारकऱ्यांनी हा सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती. संत एकनाथ महाराज यांच्या जलसमाधीला 425 वर्षे तर एकनाथी भागवत ग्रंथास 450 वर्षे पूर्ण झाली आहेत.अश्याप्रकारे आज फुलांच्या पुष्पवृष्टीत आणि टाळ मृदूंगाच्या जयघोषात भागवत ग्रंथाचा ग्रंथदिंडी सोहळा पार पडत आहे.

English Summary: 450 years of Eknath Maharajs Bhagwat Granth a grand Granthdindi ceremony in Pandharpur
Published on: 15 October 2023, 04:43 IST