News

यावर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये महाराष्ट्रात सर्वदूर अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पिके अक्षरशा मातीमोल झाली. नद्यांना आलेल्या महापुरामुळे जमीन खरवडून गेली. तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये सततच्या पावसामुळे मोसंबी, सोयाबीन,कपाशी व तूर या पिकाचे अतोनात नुकसान झाले.

Updated on 01 December, 2021 9:44 PM IST

 यावर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये महाराष्ट्रात सर्वदूर अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पिके अक्षरशा मातीमोल झाली. नद्यांना आलेल्या महापुरामुळे जमीन खरवडून गेली. तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये सततच्या पावसामुळे मोसंबी, सोयाबीन,कपाशी व तूर या पिकाचे अतोनात नुकसान झाले.

या झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात जवळजवळ चार लाख 55 हजार हेक्टर वरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, अशा आशयाची माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी लोकसभेत लेखी उत्तरात दिली. पुढे त्यांनी सांगितले की, संपूर्ण देशात पूर, अतिवृष्टी मुळे जवळजवळ पन्नास लाख हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले. जर आपण राज्यनिहाय नुकसानीची आकडेवारी पाहिली तर सर्वाधिक नुकसान हा कर्नाटक राज्याला बसला आहे.

त्यानंतर पश्चिम बंगाल,राजस्थान, बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये पिकांचे अतोनात नुकसान झाले.

 नुकसानग्रस्त राज्यांनी स्वतःच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून एकूण 8873 कोटी रुपयांची मदत नुकसानग्रस्तशेतकऱ्यांना जाहीर केली.याव्यतिरिक्तआपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निधीतून देखील मदत करण्याचा विचार असल्याचे नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले. 

हवामानात झालेल्या बदलामुळे दरवर्षी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकर्‍यांना त्याचा फटका बसत आहे. यावर उपाय म्हणून शाश्वत शेती करण्यावर अनेक घटकांकडून भर दिला जात आहे. हवामानातील प्रतिकूल परिस्थितीत तग धरू शकणार ए पिकांचे वाण विकसित करण्यावर भर देणे महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

English Summary: 4.5 lakh hecter field affected in maharashtra due to heavy rain
Published on: 01 December 2021, 09:44 IST