News

पंजाब मध्ये आम आदमी पार्टीला बहुमत मिळाले असून या पक्षाचे सरकार पंजाब मध्ये येणार आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री म्हणून आपचेभगवंत मान हे शपथ घेणार असून या शपथविधी कार्यक्रमाला जवळजवळ दोन कोटी पेक्षा जास्त खर्च येणार आहे

Updated on 15 March, 2022 7:39 PM IST

पंजाब मध्ये आम आदमी पार्टीला बहुमत मिळाले असून या पक्षाचे सरकार पंजाब मध्ये येणार आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री म्हणून आपचेभगवंत मान हे शपथ घेणार असून या शपथविधी कार्यक्रमाला जवळजवळ दोन कोटी पेक्षा जास्त खर्च येणार आहे

या शपथविधीचे विशेष म्हणजे या कार्यक्रमाला जे वाहने येतील त्या वाहनांच्या  पार्किंगच्या सोयीसाठी तब्बल काढणीला आलेल्या गव्हाचे हिरवेगार पीक नष्ट करण्यात आले आहे त्यासाठी जवळजवळ पंचेचाळीस एकर जमीन शेतकऱ्यांकडून भाड्याने घेतली गेली आहे. त्या बदल्यात शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची आश्वासन देण्यात आले आहे. हा शपथ विधी कार्यक्रम खटकडकलाया गावात होणार असून तेथेएक लाख लोकांना बसता येईल अशी व्यवस्था करण्यात येत आहे. त्यासोबतच 40000 खुर्ची  मावतील तसेचपंचवीस हजार गाड्यांची पार्किंग करण्यात साठी करता येईल यासाठी काढणीलाआलेले  गव्हाचे पीक कापण्यात आली असून गुजर समुदायाचे लोक आपल्या पशुंना चारा म्हणून गव्हाचे पीक घेऊन जात आहेत.

शेतकऱ्यांची 46 हजार रुपये प्रति एकर नुकसानभरपाईची मागणी

 या शपथविधी कार्यक्रमासाठी शेतकऱ्यांची शेतजमीन भाड्याने घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांसोबतएग्रीमेंट देखील केले आहे व त्या माध्यमातून त्यांना पीक नुकसान भरपाई दिली जाईल. परंतु केल्या गेलेल्या एग्रीमेंट मध्ये किती नुकसान भरपाई दिली जाईल हे नमूद केले नाही. या मुद्द्यावर शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की प्रतिएकर 46 हजार रुपये नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे. तेव्हा झालेला खर्च निघेल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

या 45 एकर व्यतिरिक्त अजूनही जिल्हा प्रशासन काही जमीन भाड्याने येत आहे. काही जमिनीवर उसाचे पीक आहे त्यामुळे शेतकरी जास्त नुकसान भरपाई मागतील. असा एक अंदाज आहे. या शपथविधी कार्यक्रमासाठी दोन कोटी रुपये खर्च येणार असून त्याला वित्त विभागाने देखील मंजुरी दिली आहे.

English Summary: 45 acre wheat crop destroy for oth ceremony bhagvant maan in punjaab
Published on: 15 March 2022, 07:39 IST