काल अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला. यावेळी बोलताना त्यांनी सरकार पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणार असल्याचे सांगितले, यासाठी केंद्र सरकार 90% खर्च करणार आहे.
केन बेतवा नदी जोड प्रकल्पा साठी एकूण 44600 पाच कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.या योजनेचा फायदा उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील एकूण तेरा जिल्ह्यांना होणार असल्याचे संसदेत अर्थमंत्र्यांनी सांगितले.याची पार्श्वभूमी असे की 1980 मध्ये केंद्र सरकारने जलसंसाधन विकासासाठी एक योजना तयार केली होती.
या योजनेअंतर्गत राष्ट्रीय जलविकास संस्था तयार करण्यात आली होती. यामध्ये 30 नद्यांची निवड करण्यात आली होती व यानुसार जलसिंचन, पिण्याचे पाणी व वीज उत्पादनात मदत होणार होतो. त्यामध्ये हिमालयातून निघणाऱ्या 14 तर पठारावरील 16 नद्यांचा समावेश होता. यामध्ये मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश राज्यातील केन बेतवा नद्यांचा देखील नदीजोडण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यास नागरिकांना दिलासा मिळणार आहे. बुंदेलखंड मधील 10.62 लाख हेक्टर क्षेत्रात या योजनेची सिंचनाच्या सुविधा पोहोचणार आहे. सोबत 62 लाख लोकांच्या पाण्याचा प्रश्न सुटेल व महत्त्वाचे म्हणजे या माध्यमातून 103 मेगावॅट वीजनिर्मिती सुद्धा होणार आहे.
Published on: 02 February 2022, 12:56 IST