News

शेतकऱ्यांचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. फेसबुकवर त्यांनी एक विडिओ पोस्ट करून म्हटले आहे. आयकर विभागाने देशातील ४४ कोटीहून अधिक पॅनकार्ड ग्राहकांना आधार कार्डशी लिंक करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय घेत असताना केंद्र सरकारने प्रत्येक पॅन कार्ड धारकाकडून आधार लिंक करण्यापोटी १ हजार रूपयाचा जिजीया कर आकारला आहे.

Updated on 07 April, 2023 10:20 AM IST

शेतकऱ्यांचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. फेसबुकवर त्यांनी एक विडिओ पोस्ट करून म्हटले आहे. आयकर विभागाने देशातील ४४ कोटीहून अधिक पॅनकार्ड ग्राहकांना आधार कार्डशी लिंक करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय घेत असताना केंद्र सरकारने प्रत्येक पॅन कार्ड धारकाकडून आधार लिंक करण्यापोटी १ हजार रूपयाचा जिजीया कर आकारला आहे.

यामुळे देशातील जनतेवर ४४ हजार कोटीचा दरोडा पडणार आहे. केंद्र सरकारने डिजीटल धोरणाच्या नावाखाली पॅनकार्ड धारक व्यक्तींनी आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक केले आहे. सदरचा निर्णय घेत असताना केंद्र सरकारने प्रत्येक पॅनकार्ड धारकास १ हजार रूपये खर्च येत आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशावर डल्ला मारून केंद्र सरकार तब्बल ४४ हजार कोटी रूपयाचा दरोडा टाकत आहे.

सध्या जनतेला कोणताही व्यवहार अथवा नोंदणी करत असताना आधार कार्ड व पॅन कार्ड असण बंधनकारक करण्यात आलेला आहे. केंद्र सरकार प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या जनतेकडून मोठ्या प्रमाणात कराची आकारणी करून वाढलेल्या महागाईच्या काळात सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे.

सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित, शेतकऱ्यांना होणार फायदा..

यामुळे या तुघलकी धोरणाविरोधात आवाज उठविण्यासाठी व सर्वसामान्य जनतेचा आवाज सरकार पर्यंत पोहचविण्याकरिता रविवार दिनांक ९ एप्रिल रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत #स्टॅापरॅाबरी #stoprobbary हा संदेश ट्वीटर, फेसबुक, इन्स्टांग्रामच्या माध्यमातून पाठवायचा आहे.

शेतकर्‍यांना 'हे' सरकार देणार बिनव्याजी कर्ज, जुने कर्ज फेडले की मिळणार ५% अनुदान

तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्या nsitharaman@nic.in या मेल वरती सदर धोरणाविरोधात आपल्या प्रतिक्रिया नोंदवायचे आहेत. यामुळे आता केंद्र सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेतकऱ्यांनो तणनाशकांचा अभ्यास
महावितरण घेणार तब्बल २९ हजार २३० कोटींचे कर्ज, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता..
सर्वात जास्त दूध देणारी म्हैस तयार करणारे तंत्रज्ञान शास्त्रज्ञांनी शोधून काढले, शेतकऱ्यांना होणार फायदा..

English Summary: 44,000 crore robbery from the Income Tax Department, Raju Shetty's allegation caused excitement
Published on: 07 April 2023, 10:20 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)