पीकविमा योजनेची जनजागृती सर्वांना झालेली आहे जे की शेतकरी वर्गाला माहिती झाली असल्यामुळे यावर्षी राज्यातील ४१ लाख शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. केंद्र सरकारने जरी ही योजना राबवली असली तरी सुद्धा राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि ही गोष्ट अभिमानास्पद आहे असे राज्यकृषी मंत्री दादा भुसे यांनी आपल्या बोलण्यातून व्यक्त केले आहे.
2300 कोटी रुपये राज्य सरकारकडून विमा कंपन्यांना...
नैसर्गिक संकटांमुळे यावर्षी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मात्र या योजनेची सगळीकडे मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण झाली असल्यामुळे शेतकऱ्यांचा सहभाग वाढत निघाला आहे. या योजनेचा लाभ जरी सर्व शेतकरी वर्गाला होत असला तरी यावेळी काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांचा खात्यावर उशिरा पैसे जमा झाले आहेत. शेतकऱ्यांना वेळेवर विमा मिळावा म्हणून राज्य सरकारने विमा कंपनीला २ हजार ३०० कोटी रुपये दिले आहेत. शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी राज्य सरकारने आपली महत्वाची भूमिका साध्य केलेली आहे.
2 हजार 400 कोटी रुपयांचे वाटप...
राज्यातील सुमारे ४१ लाख शेतकऱ्यांनी या योजनध्ये आपला सहभाग नोंदवला आहे. पाऊसामुळे जरी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी सुद्धा त्याच प्रकारे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सुद्धा भेटलेली आहे. राज्य सरकारने १० विमा कंपन्यांना सुमारे २ हजार ४०० कोटी रुपये दिलेले आहेत तसेच केंद्र सरकारने सुद्धा विमा कंपन्यांना रक्कम दिलेली आहे.
विमा कंपन्याच्या मनमानी कारभारामुळे विलंब...
शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे पैसे वेळेवर भेटावे म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकारने विमा कंपन्यांना सूचना देखील केल्या होत्या मात्र काही विमा कंपन्यांच्या आडमुठपणामुळे विमा परतावा देण्यास लांबला आहे. राज्याचे कृषिमंत्री तसेच कृषी आयुक्त यांनी बैठका घेतल्या तसेच केंद्र सरकारने याबद्धल कडक कारवाई केली. त्यामुळे लगेच विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई ची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर सोडण्यास सुरू केले.
Published on: 22 December 2021, 06:14 IST