काही महिन्यांपूर्वी राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. यानंतर राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यांनी बंड करत 40 आमदार घेऊन गुवाहाटी गाठले होते. या 40 आमदारांना रेडे म्हटले गेले. यावरून मोठा वाद झाला होता.
असे असताना आता सत्ताधारी मंत्री असलेले गुलाबराव पाटील यांनीही या आमदारांना रेडे म्हटले आहे. त्यांनी आमचे 40 रेडे दर्शनासाठी गुवाहाटीला जात असल्याचं म्हटलं आहे. यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील मंत्री आणि आमदार हे कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीला जाणार आहेत. यामध्ये 40 आमदार आहेत. जिल्हा दूध संघाची निवडणूक असल्याने मंत्री गुलाबराव पाटील हे गुवाहाटीला जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
पपई उत्पादक शेतकरी अडचणीत, व्हायरसच्या हल्ल्यात बागा उद्ध्वस्त
ते म्हणाले, निवडणूक असल्याने मी गुवाहाटीला जाणार नाही. आमचे बाकीचे आमदार जाणार असल्याचेही गुलाबराव पाटील म्हणाले. मुख्यमंत्र्यांसह 40 रेडे दर्शन घेण्यासाठी गुवाहाटीला जात असल्याचे म्हणत गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
राजू शेट्टी यांना सरकारकडून चर्चेसाठी निमंत्रण, चक्काजाम आंदोलन तात्पुरते स्थगित
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे गटाचे 40 रेडे गुवाहटीला जात असल्याची टीका केली होती. आता गुलाबराव पाटील स्वताच असे म्हटल्याने चर्चा सुरू झाली आहे. आमदारांचा नवस असल्याने ते देवीच्या दर्शनासाठी जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
बहुराष्ट्रीय कंपन्याच्या मुठीतूनच कृषी क्षेत्राची डिजीटलायझेशन कडे वाटचाल, राजू शेट्टी यांची एक माहिती एकदा वाचाच
विजेला हात लावाल तर कायदा हातात घेऊ, अमरसिंह कदम यांचा महावितरणला इशारा
ब्रेकिंग! स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या मुलाला पोलिसांकडून अटक
Published on: 25 November 2022, 05:14 IST