News

मोदी सरकारने सुरू केलेली महत्त्वकांक्षी योजना पंतप्रधान जन धन योजना खूप लोकप्रिय झाली आहे. आता पर्यंत या योजनेच्या अंतर्गत ४० कोटी लोकांनी खाते उघडले आहे. यात जमा करण्यात आलेली राशी १.३० कोटी रुपये झाली आहे.

Updated on 06 August, 2020 10:48 PM IST


मोदी सरकारने सुरू केलेली महत्त्वकांक्षी योजना पंतप्रधान जन धन योजना खूप लोकप्रिय झाली आहे. आता पर्यंत या योजनेच्या अंतर्गत ४० कोटी लोकांनी खाते उघडले आहे. यात जमा करण्यात आलेली राशी १.३० कोटी रुपये झाली आहे. विशेष म्हणजे ५० टक्के महिलांनी या योजनेच्या अंतर्गत बँकेत खाते उघडले आहे.

याविषयीची माहिती सरकारच्या एका विभागाकडून ट्विटर द्वारे दिले आहे. मोदी सरकारने आपल्या सुरुवातीच्या काळात ही योजना सुरु केली होती. जन धन योजनेतून शुन्य बॅलन्स वर खाते उघडू शकतो. सहा महिन्यानंतर ओव्हर ड्राफ्टची सुविधा देखील दिली जाते. यासह दोन लाख रुपयांचा अपघाती विमा कव्हर, लाईफ कव्हरही दिला जातो. अशा सुविधा मिळत असल्याने नागरिक जनधन खाते उघडण्यास पसंती करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,गेल्या सहा महिन्यात ४०.५ कोटी खाते घडण्यात आले आहेत. यासह १.३० कोटी रुपये डिपॉझिट करण्यात आली आहेत.

अर्थ मंत्रालयाच्या विभागाकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये सांगण्यात आले आहे की, जगातील फायन्याशिअस इंक्लूडन मधील पहिला रिकार्ड आहे. दरम्यान ही योजना २८ ऑगस्ट २०१४ मध्ये ही सुरू करण्यात आली होती. प्रत्येक नागरिकाचे बँकेत खाते राहावे, सर्वजण आर्थिक प्रहावात सहभागी व्हावे ही या योजनेमागचे उद्दिष्ट आहे.

English Summary: 40 crore people opened jan dhan accounts, accumulated 1.30 crore
Published on: 06 August 2020, 10:46 IST