औरंगाबाद जिल्ह्यातून महावितरणाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. जिल्ह्यातील वैजापूर तालुक्याच्या एका शेतकऱ्याला वीज जोडणी नसतानादेखील तब्बल 40 हजारांचे बिल महावितरण ने पाठवले आहे. तालुक्यातील मौजे घायगाव येथील कृष्णा रुस्तुम धने या शेतकऱ्याबाबत ही घटना घडली आहे.
विशेष म्हणजे कृष्णा यांनी विज जोडणीसाठी नऊ वर्षापूर्वी कोटेशनची रक्कम भरलेली आहे मात्र असे असतानादेखील अल्पभूधारक शेतकरी कृष्णा यांना अजूनही महावितरणने वीज जोडणी दिलेली नाही. नऊ वर्षापासून वीज जोडणी दिली नाही म्हणून हा अल्पभूधारक शेतकरी दुसऱ्याच्या शेतात शेतमजुरी करतो आणि याच शेतकऱ्याला महावितरणने तब्बल 40 हजारांचे बिल पाठवले. फक्त अल्पभूधारक शेतकरी कृष्णा यांच्यासोबतच असा प्रकार घडला आहे असे नाही तर तालुक्यातील तब्बल 6 हजार शेतकऱ्यांना वीज जोडणी नसताना महावितरणने विज बिल पाठवले आहेत. यामुळे संबंधित शेतकरी महावितरणच्या गलथान कारभाराच्या बळी पडत असल्याचे सांगितले जात आहे.
अल्पभूधारक शेतकरी कृष्णा धने यांनी 2008 मध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर खोदली होती. विहीर खोदल्यानंतर 2013 मध्ये त्यांनी विज जोडणी साठी कोटेशन देखील भरले यासाठी त्यावेळी त्यांना 5,300 रुपये अनामत रक्कम म्हणून भरावे लागली. असे असले तरी त्यांना अजूनही वीज जोडणी देण्यात आलेली नाही, विशेष म्हणजे याबाबत संबंधित शेतकऱ्यांना वेळोवेळी महावितरण कार्यालयाकडे धाव देखील घेतली आहे. तरीदेखील महावितरणने या संबंधित शेतकऱ्याला वीज जोडणी दिलीले नाही.
शेतीपंपासाठी कृष्णा आतापर्यंत डिझेल पंपाचा वापर करत आहेत. वीज जोडणी देण्यात यावी यासाठी कृष्णा यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील मागणी केली होती. मात्र, या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मागणीकडेतेव्हाही कोणी लक्ष दिले नाही. शेवटी कंटाळून कृष्णा यांनी आत्ता देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.
महावितरणने आपल्या गलथान कारभारावर पडदा टाकण्यासाठी या संबंधित शेतकऱ्याला तब्बल 40 हजारांचे विज बिल पाठवले आणि संबंधित शेतकरी आकडा टाकून वीज चोरी करत असल्याचा आरोप देखील महावितरणने केला. यासाठी महावितरणने आपण संबंधित शेतकऱ्याचा शोध तपास घेतला असल्याचा जावई शोध लावला आहे. यामुळे महावितरणवर शेतकऱ्यांचा रोष अजूनच वाढत आहे.
यामुळे दिले बिल
शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, 2011साली महावितरणने महावितरण आपल्या दारी ही योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत पाच खांबांच्या आत अंतर असलेल्या शेतकऱ्याला वीज जोडणी दिलेली नसली तरीदेखील आकडे टाकून वीज वापरण्याचा अधिकार होता. त्यावेळेस, ज्या शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी कोटेशन अर्थात अनुमोदित रक्कम भरलेली असेल त्या शेतकऱ्यांना रेगुलर वीजग्राहक समजून बिल देण्यास सुरवात झाली. वैजापूर तालुक्यात असे एकूण 6000 शेतकरी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
विशेष म्हणजे सदर शेतकरी आकडे टाकतात की नाही याबाबत महावितरणकडे कुठलाच ठोस पुरावा नाही? असे असतानाही केवळ अंधारात तीर मारण्यासारखे महावितरण अंदाज बांधत असून सदर शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करत असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.
संबंधित बातम्या:-
भयावय! 500 एकरावरील उस फडातच जळून खाक, शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान
विजेवर पहिला अधिकार शेतकऱ्यांचा; म्हणून शेतकऱ्यांना दिवसा वीज दिली नाही तर जनआंदोलन करू: राजू शेट्टी
Published on: 28 March 2022, 02:22 IST