News

हिवाळ्यात भेंडीचे उत्पादन घेणे म्हणजे जिकिरीचे काम आहे. हिवाळ्यात भेंडीचे उत्पादन हवे तेवढ्या प्रमाणात निघत नाही. त्यामुळे स्थानिक बाजारात देखील हिवाळ्यामध्ये भेंडीची आवक भरपूर प्रमाणात कमी असते.

Updated on 10 January, 2022 9:18 AM IST

हिवाळ्यात भेंडीचे उत्पादन घेणे म्हणजे जिकिरीचे काम आहे. हिवाळ्यात भेंडीचे उत्पादन हवे तेवढ्या प्रमाणात निघत नाही. त्यामुळे स्थानिक बाजारात देखील हिवाळ्यामध्ये भेंडीची आवक भरपूर प्रमाणात कमी असते.

परंतु या भेंडीची चक्क विदेशात निर्यात करून शिंदखेडा तालुक्यातील वारुड आणि डांगुर्णे या दोन गावातील 37 शेतकऱ्यांनी एक प्रेरणा ठरावा असा उपक्रम हाती घेऊन पूर्ण करून दाखवला आहे.

 या पद्धतीने केले शक्य….

 शिंदखेडा तालुक्यातील वरूड आणि डांगुर्णे या दोन गावांतील शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी विजय बोरसे यांनी विकेलते पिकेल योजनेत सहभागी करून घेतले.या 37 शेतकऱ्यांनी बारा हेक्टर मध्ये भेंडीचे पीक घेतले. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने काही शेतकऱ्यांनी परिश्रम घेऊन चार महिन्याच्या कालावधीत घ्यायच्या काळजी घेतली.

.याबाबत कृषि विभागाचे मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांचे परिश्रम या दोन्ही कामाला आले. एवढेच नाही तर भेंडी निर्यात करण्यासाठी त्यांनी मुंबईतील एका कंपनीसोबत विभागाच्या माध्यमातून निर्यातीचा करार देखील केला. ही सगळी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याच्या भेडिंला थेट लंडनहून मागणी आहे. त्यामुळे शिंदखेडा तालुक्यातील भेंडी आता लंडनच्या बाजारात देखील भाव खात आहे.

आतापर्यंत या दोन गावांमधून 750 क्विंटल भेंडीची  निर्यात झालेली आहे. याकरिता तेथील शेतकऱ्यांनी विकेल तेच पिकेल या योजनेचा लाभ झाला आहे. तसेच कृषि विभागाचे मार्गदर्शन यामुळेच हे शक्य झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. मालाच्या प्रतवारीनुसार पॅकिंग आणि करार झालेल्या कंपनीच्या वाहनाद्वारे निर्यात हा कार्यक्रम गेल्या महिनाभरा पासून सुरू आहे.

English Summary: 37 farmer in shindkheda taluka export ladyfinger to london
Published on: 10 January 2022, 09:18 IST