News

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेली महत्त्वपूर्ण योजना होती. त्यावेळी सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करताना जे शेतकरी नियमितपणे पिकं कर्जाची परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान देण्याची घोषणा केली होती. परंतु कालांतराने राज्यात आणि संपूर्ण जगात कोरोना महामारीमुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटल्यामुळे या योजनेला ब्रेक लागला होता.

Updated on 14 February, 2023 3:54 PM IST

 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेली महत्त्वपूर्ण योजना होती. त्यावेळी सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करताना जे शेतकरी नियमितपणे पिकं कर्जाची परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान देण्याची घोषणा केली होती. परंतु कालांतराने राज्यात आणि संपूर्ण जगात कोरोना महामारीमुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटल्यामुळे या योजनेला ब्रेक लागला होता.

परंतु मध्यंतरीच्या कालावधीत सत्तेत आलेल्या शिंदे फडणवीस सरकारने ही योजना पूर्ण कार्यान्वित केली व 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देणे शेतकऱ्यांना सुरू केले. त्याच अनुषंगाने एक महत्वपूर्ण अपडेट समोर आली असून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खूप दिलासादायक आहे.

 नांदेड जिल्ह्यातील 9000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना मिळाला 36 कोटींचा लाभ

 याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, नांदेड जिल्ह्यातील तब्बल नऊ हजार तीनशे एकवीस शेतकऱ्यांना  36 कोटी 58 लाख रुपयांचा निधी प्रोत्साहन अनुदानापोटी वितरित करण्यात आला आहे. परंतु जिल्ह्यामध्ये अजून देखील 30000 पेक्षा जास्त शेतकरी या लाभापासून वंचित असून संपूर्ण राज्याचा विचार केला

तर पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी तब्बल 1000 कोटींचा निधी वितरणाला देखील मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील जे काही राहिलेले तीस हजार शेतकरी आहेत त्यांना देखील लवकरच या योजनेअंतर्गत लाभ मिळेल अशा आशयाची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

 जर नांदेड जिल्ह्यातील एकूण पात्र शेतकऱ्यांचा विचार केला तर ती संख्या 62,504 इतकी आहे. परंतु यापैकी 32 हजार 909 शेतकऱ्यांच्या याद्या या विशिष्ट क्रमांकासह प्रसिद्ध करण्यात आले असून शेतकऱ्यांचे विशिष्ट क्रमांकासह  यादीमध्ये नाव आहे अशा शेतकऱ्यांना आधार प्रमाकरणीकरण करणे गरजेचे असून ते केल्यानंतर शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे.

नांदेड जिल्ह्यामध्ये सध्या परिस्थितीत 30720 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे. यामधून 9321 शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहन लाभाचे 36 कोटी 58 लाख रुपये जमा झाल्याची माहिती उपनिबंध कार्यालयाच्या माध्यमातून देण्यात आले आहे. 

उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील लवकरच या योजनेअंतर्गत अनुदानाची रक्कम जमा होणार आहे. महत्वाचे म्हणजे या बाबतीत ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी तालुका आणि जिल्हास्तरीय समितीकडे प्राप्त झालेल्या आहेत अशा शेतकऱ्यांनी तालुका सहनिबंधक कार्यालयाकडे संपर्क साधून लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन देखील जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाकडून करण्यात आले आहे.  या निर्णयाने आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून राहिलेल्या शेतकऱ्यांना देखील लवकरात लवकर अनुदान मिळावे ही एक अपेक्षा आहे.

English Summary: 36 crore rupees approvel for farmer insentive scheme for nanded district farmer
Published on: 14 February 2023, 03:54 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)