Water Shortage
पावसाने मागील १० ते १२ दिवसांपासून उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकरी आता पावसाची वाट पाहत आहे. धरणासाठ्यातील पाणीसाठा पाहिला तर चिंता वाढली आहे. मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणात केवळ ३४.११ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
गतवर्षी आजच्या दिवशी जायकवाडी धरणसाठ्यात ९४.९९ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे नागरिकांनी मोकळा श्वास घेतला होता. पण आता मराठवाड्यात पावसाने विश्रांती दिल्यामुळे अनेक भागात टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे.
मराठवाड्यातील नांदेडचा काही भागातच चांगला पाऊस आहे. तर इतर भागात मात्र जोरदार पावसाची शेतकऱ्यांना अपेक्षित आहे. पेरणी केलेली पिके पाण्याला आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. पाण्याअभावी विहीर कोरड्या पडल्या आहेत. त्यात पावसाने दडी मारल्याने पाण्याअभावी पीके वाळू लागली आहेत.
Published on: 16 August 2023, 11:11 IST