News

शेतकरी कष्टकरी वंचितांसाठी जीवन समर्पित करणारे श्री संतोष भाऊ परीहार

Updated on 08 August, 2022 8:56 PM IST

शेतकरी कष्टकरी वंचितांसाठी जीवन समर्पित करणारे श्री संतोष भाऊ परीहार यांच्या वाढदिवसानिमित्त जीवन परिचय.जगात खूप लोक असतात जे सामाजिक राजकीय क्षेत्रात आपल्या दैदिप्यमान कार्याने कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवतात ते पण कोणत्याही पद प्रसिद्धीची अपेक्षा न करता.सूर्य कधीच तळहाताने झाकल्या जात नसतो आणि अश्या लोकांना परिचयाची गरज पण भासत नाही. अशीच एक शांत संयमी राजकीय

विश्लेषक कृषीतज्ञ शेतकरी योद्धा म्हणून जिल्ह्यात सर्वांचे परिचयाचे असलेले संतोष परीहार यांच्या जीवनाचा शेतकरी कष्टकरी समाजातील दुर्बल घटकासाठी अविरत सुरू असलेला संघर्ष प्रशंसनीय आहे, संतोष परीहार यांचा जन्म चिखली तालुक्यातील अंचरवाडी गावातील सुसंस्कृत सधन शेतकरी कुटुंबात झाला लहानपणापासून तल्लख बुद्धीचे असल्याने प्राथमिक शिक्षणानंतर बुलडाणा

येथील भारत विद्यालयात प्रवेश घेतला लहानपणापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात आवड असल्याने एनएसआय चे जिल्हा सरचिटणीस म्हणून कार्य करीत असतांना 1999 मध्ये नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात शालेय पाठ्यपुस्तकातील ज्योतिष्य शास्त्र, व भविष्य शास्त्र सारखे कर्मकांड विषय वगळण्यात यावे यासाठी आंदोलनात हजारो तरुणांना सोबत घेऊन नागपूरला

धडकले नवयुवकांची मन जिंकून त्यांना एकसंघ करण्याची कार्यशैली व राजकीय, शिक्षणीक, व कृषी विषयक अभ्यास पाहता सगळीकडे नेहमी चर्चेत असायचे.Educational and agricultural studies were always in discussion everywhere अश्यातच गावाकडच्या शेतीची ओढ लागल्याने त्यांनी वडिलोपार्जित शेती करण्याचा निर्णय घेतला शेती करतांना जावे त्यांच्या वंशी तेंव्हा कळे म्हणी प्रमाणे शेतकर्यांचे खरे कष्ट व त्यांच्या अठरा विश्व दारिद्र्याची जाणीव प्रत्यक्षात आली.

कृषी क्षेत्रात पदवीका घेतलेली होती जिल्हा परिषद मध्ये पण काही काळ शासकीय सेवेचा अनुभव होता, जिल्ह्याच राजकारण सोडून शासकीय सेवा, शासकीय सेवा सोडून शेती , शेती करीत असतांना शेतकर्यांचे फक्त मालाला भाव हीच एक समस्या नसून सात बारा नोंद पासून विहीर, स्प्रिंकलर, पंप, मोटार, वीज बिल, वीज कनेक्शन जोडणी, सारख्या योजना घेतांना शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट सह

शेकडो समस्या आढळल्या, शेतकरी सेवा हाच माझा कर्म आणि धर्म असा निश्चय केला व संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांना संघर्ष योद्धा म्हणून ख्याती मिळाली असे माजी खासदार राजू शेट्टी साहेब यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला, व आजही तालुक्यातील कित्तेक शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देत कृषी विषयक योग्य मार्गदर्शन करीत असतात, शेतकरी सेवेचा मनातून निश्चय

केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील ऊस एफआरपी, दूध दर वाढ, सोयाबीन कापूस भाव वाढ सारख्या आंदोलनात जिल्ह्यातच नव्हे तर पुणे अमरावती नागपूर आळंद सोलापूर कोल्हापूर येथे जाऊन भाग घेतला, जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात ज्याची नोंद घेतली असे त्यांच्या नेतृत्वात झालेले रौद्र आंदोलन म्हणजे नाफेड कार्यालय जाळले ते, 2018 मध्ये नाफेड मध्ये

शेतकऱ्यांनी विकलेल्या तुर,हरबरा मालाचे दाम (चुकारे) मिळत नसल्याने कित्तेक शेतकऱ्यांच्या मुलींचे लग्न थांबले, उपचार विना वेदना सहन करीत होते तर मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाची चिंता वाढली होती, ही बातमी जेंव्हा संतोष परिहार यांना कळाली त्यावेळी आपले सहकारी आंदोलक अनिल जी वाकोडे व रामेश्वर परीहार यांच्या सहकार्याने नाफेड कार्यालयावर धडकले त्यांच्या आंदोलनाची शैली

पाहता वीर क्रांतिकारी भगतसिंग राजगुरू सुखदेव यांनी ब्रिटिश सरकारचे डोळे उघडावे म्हणून केलेले आंदोलन आठवले, शेतकऱ्यांना हे सरकार व नाफेड चे व्यापारी सहजासहजी त्यांच्या हक्काचे दाम देणार नाही हे जाणून होते निद्रावस्थेत असलेल्या सरकारचे डोळे उघडावे म्हणून चिखली येथील नाफेड चे कार्यालय पेटवून दिले इतकंच नाही तर पळून न जाता स्वतःहून पोलीस स्टेशन मध्ये जावून या तीव्र

आंदोलनाची जबाबदारी घेतली तिघांना एमसीआर मध्ये तेहतीस दिवसाचा तुरुंगवास झाला, सर्वच वृत्तपत्रात या आंदोलनाची वार्ता लागली झोपलेल्या सरकारला जाग आली व शेतकऱ्यांना त्यांच्या घामाच्या मालाचे दाम मिळाले, 33 दिवसाने तुरुंगातून बाहेर आल्यावर पण 3 तीन वर्षे कोर्टाच्या पायऱ्या झिजवत राहिले इतके कष्ट सहन करून ही संघटनेकडून पद सन्मानाची अपेक्षा न ठेवता त्यांची शेतकरी सेवा अविरत चालूच आहे, शासकीय सेवा,

बागायती शेती सगळं काही सुखी संपन्न आयुष्याला वेशीवर टांगून लग्नाची बेडी कधी आपल्या शेतकरी सेवेत बाध्य (अडचणीची) ठरू नये म्हणून स्वतःच्या स्वप्नांना तिलांजली देत आजही शेतकऱ्यांच्या कधी न संपणाऱ्या लढ्याला संघर्षाची साथ देत गोर गरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावत आहेत, संघर्षाच्या लखलखत्या ताऱ्याला शेतकरी कष्टकऱ्यांच्या सारथीला कृषीतज्ञ राजकीय विश्लेषक, शेतकरी पुत्र संतोष परीहार यांना निरोगी, सुदृढ, मंगलमय, उदंड, आयुष्याच्या अनंत कोटी शुभेच्छा.

 

मुख्तार शेख

७०५७९११३११

English Summary: 33 days of imprisonment, a tough journey in the farmers' movement!
Published on: 08 August 2022, 08:56 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)