News

राज्यातील साखर कारखान्यांनी संपलेल्या ऊस गाळप हंगामात शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर एफआरपीचे तब्बल 31 हजार कोटी रुपये जमा केलेले आहेत. यामुळे ही एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

Updated on 21 July, 2022 12:53 PM IST

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. यामुळे अनेकांचे ऊस शिल्लक राहिले, तर काही शेतकऱ्यांनी आपले ऊस पेटवून दिले. आता शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील साखर कारखान्यांनी संपलेल्या ऊस गाळप हंगामात शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर एफआरपीचे तब्बल 31 हजार कोटी रुपये जमा केलेले आहेत. यामुळे ही एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

दरम्यान, शेतकर्‍यांना देय एफआरपीचा थकित आकडा 1 हजार 536 कोटी 19 लाख रुपये आहे. एकूण देय रकमेच्या हे प्रमाण 3.16 टक्क्यांइतके आहे. आयुक्त कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. काही कारखान्यांनी एफआरपीपेक्षा अधिक रक्कम शेतकर्‍यांना दिलेली आहे. मात्र हे कारखाने मोजकेच आहेत. तसेच राज्यातील 90 साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांना एफआरपीची शंभर टक्के रक्कम दिलेली आहे. तर 80 ते 99 टक्के रक्कम देणारे 99 कारखाने आहेत.

तसेच पुढे 60 ते 79 टक्के रक्कम 7 कारखान्यांनी आणि शून्य ते 59 टक्के रक्कम 4 कारखान्यांनी दिलेली आहे. सध्याच्या साखर आयुक्तालयाच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. हंगामात एकूण 200 साखर कारखाने सुरू होते.

दिवसाला 20 ते 30 लिटर दूध देणाऱ्या म्हशी, शेतकऱ्यांनो कष्टाचा घ्या मोबदला, वाचा सविस्तर..

उस एफआरपीची एकूण देय रक्कम 32 हजार 82 कोटी 62 लाख रुपये होती. त्यापैकी 31 हजार 68 कोटी 49 लाख रुपये शेतकर्‍यांना देण्यात आलेले आहेत. असे असले तरी अजून 110 कारखान्यांकडून एफआरपीची रक्कम देणे बाकी आहे. यामुळे एफआरपीची रक्कम थकीत ठेवल्याप्रकरणी साखर आयुक्तालयाने पाच कारखान्यांवर जप्तीच्या कारवाईचे आदेश संबंधित जिल्हाधिकार्‍यांना दिलेले आहेत.

आता मोदींच्या २ हजारासाठी चुकीची माहिती दिली असेल तर होणार शिक्षा, जाणून घ्या..

या कारखान्यांमध्ये सोलापूर सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी, ता. पंढरपूर. पुणे राजगड सहकारी, निगडे, ता. भोर. बीड अंबाजोगाई सहकारी, ता. अंबाजोगाई, बीड वैद्यनाथ सहकारी, ता. परळी. उस्मानाबाद जयलक्ष्मी शुगर प्रो. नितळी. या कारखान्यांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या;
पावसाचा जोर ओसरला, आता नुकसानाच्या पंचनाम्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना निधी वितरीत, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
आता काही दिवस पावसाची विश्रांती! 'या' तारखेला पुन्हा मुसळधार पाऊस कोसळणार, पंजाबरावांनी व्यक्त केला अंदाज...

English Summary: 31 thousand crores of FRP deposited in farmers' bank accounts, relief to sugarcane farmers
Published on: 21 July 2022, 12:53 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)