थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज खंडित करण्याची मोहीम संबंध राज्यात सुरू आहे. या प्रश्नावरून अगोदरच वातावरण तापलेले असताना अनेक शेतकरी संघटना यामध्ये आक्रमक झाले आहेत.
अशा परिस्थितीत महावितरण कडून कृषी पंपाचे थकबाकी व त्यावरील व्याज यामध्ये सवलत देण्याची योजना सुरू आहे. महावितरणच्या या योजनेचा लाभ घेत नांदेड परिमंडळातील तब्बल तीन हजार शेतकरी हे थकबाकी मुक्त झाले आहेत. यामध्ये 135000 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला असून चालू वीजबिल आणि मार्च दोन हजार बावीस पर्यंतचे सुधारीत थकबाकी पैकी पन्नास टक्केच रक्कम अदा करावी लागणार आहे. महावितरणच्या या योजनेनुसार कृषी पंप थकबाकीदार शेतकऱ्यांनी जर चालू वीजबिल तसेच त्यासोबतच मार्च 2022 पर्यंत ची थकबाकी चा 50 टक्के भरणा केला तर त्यामध्ये 50 टक्के सवलत ही मिळणार आहे.
त्यामुळे संपूर्ण राज्यातील 44 लाख 50 हजार शेतकऱ्यांनी जर या योजनेचा लाभ घेता तर पंधरा हजार 353 कोटी 88 लाख रुपये माफ होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी या 50 टक्के सवलतीचा लाभ घेण्याची गरज आहे. एवढेच नाही तर या योजनेच्या माध्यमातून जे काही थकबाकी जमा होईल त्यातून त्या-त्या क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी हा पैसा वापरला जाणार आहे.
नांदेड परी मंडळामध्ये 96 कोटी 64 लाख रुपयांचा भरणा झाल्याने आता या वसुलीतून वीज वितरणासाठी पायाभूत सुविधा उभारण्यात येणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे तसेच या योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत 31 मार्च आहे.
Published on: 01 March 2022, 11:23 IST