सध्या बाजारात मागील चार दिवसांमध्ये कापूस दरात क्विंटलमागे ३०० रुपयांची सुधारणा झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजार तसेच देशातही कापसाचे वायदे चांगलेच वाढले. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असल्याचे सांगितले जाते.
देशातील बाजारात दीड महिन्यानंतर कापूस दराने ७ हजार ५०० रुपयांचा टप्पा पार केला. तर दीड महिन्यानंतर वायद्यांमध्ये कापूस ५९ हजारांच्या पुढे गेला. चीनमधून कापूस खरेदी वाढली. सुतालाही मागणी वाढत आहे. कापडाला उठाव वाढला.
या कारणांनी आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात सुधारणा झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव वाढल्याने देशातील बाजाराला आधार मिळाल्याचे सांगितले जाते. शेतकऱ्यांकडे सध्या अजूनही कापूस पडून आहे.
सुताचे भाव अनेक बाजारांमध्ये किलोमागे ४ ते ५ रुपयांनी वाढले. यामुळे कापसालाही उठाव येत आहे. देशातही सणांमुळे कापडाला उठाव वाढत आहे. यामुळे पुढील तयार गोष्टी देखील वाढणार आहेत.
जावं तिथं फक्त अश्रूंचा बांध फुटतोय..! नि:शब्द झालोय..!
कापसाला आज सरासरी ६ हजार ७०० ते ७ हजार ५०० रुपये भाव मिळाला. ऑगस्ट महिन्यात कापसाला चांगला उठाव असतो. त्यामुळे कापसाच्या दरातील तेजी कायम दिसू शकते, असेही सांगितले जात आहे.
मोत्यांची शेती करून शेतकरी होत आहेत श्रीमंत, जाणून घ्या
देशात पावसाचा हाहाकार! २२ हून अधिक राज्यांमध्ये भयानक स्थिती, पुढील ३ दिवस मुसळधार..
नुकसान होवून ३ दिवस झाले तरी कोणत्या मंत्र्याने पाहणी सुद्धा केली नाही, पीक गेली, जमिनी गेल्या, शेतकरीही दगावले..
Published on: 27 July 2023, 09:50 IST