दररोज आपल्या वाचनामध्ये किंवा ऐकण्यात अशा काही गोष्टी येतात की जे ऐकून विश्वास बसत नाही किंवा त्या एकदम आश्चर्य करून टाकणारे असतात.
. अशीच एक आश्चर्य करणारी बातमी मध्यप्रदेश राज्यातील खंडवायेथील देशगाव मध्ये राहणाऱ्या एका शेतकरी तरुणाची बाबतीत घडली. या तरुणाच्या बँक खात्यामधून एक नव्हे,दोन नव्हे तर तब्बल तीनशे कोटींचा व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या तरुणाला चक्क इन्कमटॅक्स विभागाने नोटीस पाठवली आहे. जेव्हा तरुणाला हे माहिती पडलं तेव्हा या तरुणाला धक्का बसला आहे.
नेमके जाणून घेऊ हे प्रकरण
हा मुलगा एका शेतकरी कुटुंबातील असून तो मोबाईल चे दुकान चालवतो.
या तरुणाच्या बँक खात्यांमधून चक्क 290 कोटी 39 लाख 36 हजार आठशे सत्तर रुपयांचा व्यवहार करण्यात आला आहे.जेव्हाही माहिती इन्कम टॅक्स विभागाला कळली तेव्हा त्यांनी कारवाई केली आहे. या मुलाचं बँक खाते हे पॅन कार्ड च्या माध्यमातून मुंबईमधील ॲक्सिस बँकेत आहे. या खात्यामधून हा व्यवहार करण्यात आला आहे.याप्रकरणामुळे हा तरुण खूपच त्रस्त झाला असून प्रवीण असे नाव असलेले या तरुणाला आधी दोन नोटीस पाठवण्यात आले आहे परंतु त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले परंतु आयकर विभागाची तिसरी नटीसआल्याने मात्र त्याच्या पायाखालची जमीन सरकली. याबाबत त्यांनी सांगितले की त्यांनी अजून पर्यंत मुंबई देखील पाहिलेली नाही. त्याच्या नावाने मुंबईमध्ये फेक अकाउंट ओपन करण्यात आले आहे. या अकाउंट मधून हा तीनशे कोटींचा व्यवहार करण्यात आल्याने त्याला मोठा धक्का बसला आहे.
त्याचं पॅन कार्ड वापरून ही फसवणूक करण्यात आली आहे.एका कॉल सेंटर मध्ये जॉब साठी त्यांनी आपले पॅन कार्ड देण्याचे सांगितले.तिथेच काहीतरी फसवणुकीचा प्रकार झाल्याचे त्याने म्हटले आहे. याबाबतचा अधिक तपास सुरू असून आयकर विभागाने त्याला नोटीस पाठवल्याने प्रविणा मानसिक रित्या खूपच खचून गेला आहे. याबाबतचेवृत्त एका हिंदी वेबसाईटने दिले आहे.
Published on: 15 March 2022, 10:47 IST