हिंगोली
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील बाजार समितीत हळदीला ३० हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला आहे. यामुळे हळद उत्पादक शेतकरी समाधानी झाले आहेत. आजवरचा हा उच्चांकी दर आहे.
वसमत बाजार समितीत बाराही महिने हळदीची विक्री केली जाते. परभणी जिल्ह्यातील शेतकरी शेषेराव बोंबले यांनी त्यांच्याकडील अकरा पोती हळद वसमतच्या बाजारात विक्रीसाठी आणली होती. तेव्हा या हळदीला तब्बल ३० हजार रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला आहे.
हिंगोली बाजार समितीत लिलाव पद्धतीने हळदीची विक्री केली जाते. त्यामुळे हळद उत्पादक शेतकरी येथे हळद विक्रीला आणतात. तसंच हळदीच्या दरात फारशी तेजी-मंदी होण्याची शक्यता नसून दर टिकून राहतील, असा अंदाज हळद उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.
Published on: 05 August 2023, 12:13 IST