News

महाराष्ट्रामध्ये जो काही पाऊस झाला त्या पावसाने शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान केले. जवळजवळ राज्यात या वर्षी 27 लाख शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहेत. अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर 3500 कोटी रुपयांची मदत पोहोचली असल्याचे अब्दुल सत्तार यांनी म्हटले.

Updated on 18 September, 2022 1:23 PM IST

महाराष्ट्रामध्ये जो काही पाऊस झाला त्या पावसाने शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान केले. जवळजवळ राज्यात या वर्षी 27 लाख शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहेत. अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर 3500 कोटी रुपयांची मदत पोहोचली असल्याचे अब्दुल सत्तार यांनी म्हटले.

तसेच ऑनलाइन इ पीक पाहणीत देखील बदल करण्याची केंद्र सरकारकडे मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत पोहोचली असून सर्व जिल्हाधिकार्‍यांनी पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाईन सोडले आहेत.

नक्की वाचा:धानुका अँग्रीटेक कडून नाशिकमध्ये द्राक्ष तज्ञांचा मेळावा आयोजित

एवढेच नाही तर मराठवाड्यामध्ये शंखी गोगलगाय मुळे सोयाबीन पिकाचे जे काही नुकसान झाले आहे अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देखील 97 कोटी रुपयांची मदत जाहीर केल्याची माहिती त्यांनी दिली.

लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यामध्ये शंखी गोगलगाय मुळे पिकांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदतीचे निर्देश दिले होते व त्यानुसार या तीन जिल्ह्यांना 98 कोटी 58 लाख रुपये देण्यात आल्याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.

नक्की वाचा:वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान, घरात पाणी शिरल्याने अन्नधान्याचे नुकसान

तसेच त्यांनी म्हटले की शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जे शेतीत प्रगती करत आहे अशा शेतकऱ्यांची यशोगाथा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी त्यासाठी प्रचार व प्रसार करावा जेणेकरून इतर शेतकऱ्यांना अशा शेतकऱ्यांचा आदर्श घेता येईल. एवढेच नाही तर शासनाच्या ज्या काही कृषी योजना आहेत त्यांची माहिती कृषी यंत्रणांच्या माध्यमातून गावातील शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे.

या सगळ्या माध्यमातून शेतकरी सुखी व्हावा व शासकीय योजनांचा लाभ थेट गावातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे देखील अब्दुल सत्तार यांनी म्हटले.

नक्की वाचा:SCO Summit 2022: पंतप्रधान मोदींनी अन्न सुरक्षेचा मुद्दा केला उपस्थित; मोदी म्हणाले...

English Summary: 3 thousand 350 crore compansation package collect in farmer bank account
Published on: 18 September 2022, 01:23 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)